कोलंबो, 24 मार्च : भारताचा शेजारी देश श्रीलंकेला (Sri Lanka Economic Crisis) अनेक देशांच्या कर्जात बुडून दिवाळखोर घोषित केलं जाऊ शकतं. देशात महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इथं दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो साखरेची किंमत 290 रुपये आहे. तांदूळ 500 रुपये प्रतिकिलोवर मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 400 ग्रॅम दुधासाठी आता तब्बल 790 रुपये मोजावे लागत आहेत. जानेवारीमध्ये, श्रीलंकेचा परकीय चलन साठा 70% ने घसरून $2.36 अब्ज झाला. श्रीलंकेला पुढील 12 महिन्यांत $7.3 अब्ज (सुमारे 54,000 कोटी रुपये) देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. यामध्ये एकूण कर्जापैकी 68 टक्के कर्ज चीनचे आहे. या कर्जापोटी चीनला 5 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील. हे वाचा - Russia- Ukraine युद्धात आता अतिसंहारक रासायनिक शस्त्रांचा वापर? NATO च्या Emergency मीटिंगमध्ये बायडन
श्रीलंकेत उपासमारीचा आणि हताश परिस्थितीचा सामना करत असलेली काही कुटुंबं बेकायदेशीरपणे भारतात येत आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी मच्छिमारांनी त्यांच्याकडून 50 हजार ते 3 लाख रुपये घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी श्रीलंकेचे 16 नागरिक समुद्रमार्गे भारतात पोहोचले.
त्यापैकी एक जोडपं तर चार महिन्यांच्या मुलाला घेऊन इथं आलं आहे. अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख गजेंद्र (वय 24) आणि त्याची पत्नी मेरी क्लेरिन्स (वय 22) अशी केली आहे. त्यांच्यासोबत चार महिन्यांचा मुलगा निजथही होता. हे वाचा - युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा 70 टक्क्यांनी घसरून $2.36 अब्ज झाला. श्रीलंकेला पुढील 12 महिन्यांत एकूण $7.3 अब्ज (सुमारे 54,000 कोटी रुपये) देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. यामध्ये एकूण कर्जापैकी 68 टक्के कर्ज चीनचं आहे. त्यांना चीनला 5 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारतानं मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं आपल्या शेजारी देशाला $900 दशलक्षपेक्षा जास्त कर्जाची घोषणा केली आहे. यामुळं या देशाला परकीय चलनाचा साठा वाढण्यास आणि अन्नधान्य आयात करण्यास मदत होईल.