Home /News /videsh /

Video: युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? सुपर मार्केटमध्ये साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक

Video: युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? सुपर मार्केटमध्ये साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक

Russia-Ukraine War and Food Crisis: इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांकडून साखरेने भरलेल्या पिशव्या कशा हिसकावून घेत आहेत, हे दिसत आहे. युद्धामुळे सामान्य माणसाला कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
    मॉस्को, 22 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia-Ukraine War)दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांवर परिणाम होत आहे. जनता उद्ध्वस्त, निराधार झाली असून अन्न संकटाने (Food Crisis) त्रस्त आहे. याचं एक ताजं उदाहरण रशियामध्ये दिसून आलं, येथे सुपर मार्केटमधील (Super Market) काही लोक साखरेसाठी एकमेकांशी भांडू लागले. या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खरं तर, युक्रेनवरील हल्ल्यानंतर आर्थिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या रशियामधील काही स्टोअरमध्ये प्रति व्यक्ती 10 किलो साखरेची मर्यादा लागू करण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून साखरेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत आणि रशियाचा वार्षिक चलनवाढीचा दर 2015 पासून सर्वाधिक आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांकडून साखरेने भरलेल्या पिशव्या कशा हिसकावून घेत आहेत, हे दिसत आहे. युद्धामुळे सामान्य माणसाला कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तर रशियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले की, देशात साखरेचा तुटवडा नाही आणि दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे, तसेच साखर कारखानदारांकडून भाव वाढवण्यासाठी साठेबाजी करून ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्याचबरोबर सरकारने देशातून साखरेच्या निर्यातीवरही तात्पुरती बंदी घातली आहे. हे वाचा - तुम्हीच मुख्यमंत्री होतात... काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर अब्दुल्ला संतापले रशियामध्ये साखरेच्या किमती 31 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तसेच पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे इतर अनेक उत्पादने महाग होत आहेत. अनेक पाश्चिमात्य उद्योगपतींनी रशिया सोडला आहे आणि त्यामुळे कार, घरगुती वस्तू तसेच दूरदर्शन यांसारख्या विदेशी आयात वस्तूंची तीव्र कमतरता आहे. हे वाचा - याठिकाणी होणार सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती; मुस्लीम व्यक्तीने दान केली जमीन रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील सामान्य नागरिक या युद्धामुळे त्रस्त झाले आहेत. युक्रेनमधील लाखो लोकांना देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्याच वेळी, देशाच्या आर्थिक बहिष्कारामुळे रशियामधील लोकांवरही वाईट परिणाम झाले आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या