वॉशिंग्टन, 24 मार्च : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) हे चार दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी निघाले आहेत. तिथं ते युक्रेनमधील रशियन आक्रमणावर (Russia-Ukraine War) चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. युक्रेन युद्धात रशिया रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकतो ही शक्यता ‘मोठा धोका’ असल्याचं बुधवारी निघाल्यानंतर बायडन यांनी पत्रकारांना सांगितलं. गुरुवारी या विषयावर नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. रशिया युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रांचा किंवा अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, अशी भीती आहे.
हे वाचा - युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक
राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रथम ब्रुसेल्स इथं थांबणार आहेत. इथं ते नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या आपात्कालीन शिखर परिषदेला उपस्थित राहतील. युरोपियन युनियन आणि G7 गटाच्या बैठकांमध्येही ते सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांना सांगितलं, ‘राष्ट्राध्यक्ष बायडन नाटोच्या तातडीच्या बैठकीला उपस्थित राहतील, ज्यामध्ये NATO सदस्य देशांच्या इतर 29 नेत्यांचा समावेश असेल.’
ते म्हणाले होते, ‘ते G-7 नेत्यांसोबत बैठका घेतील आणि युरोपियन कौन्सिलच्या सत्रादरम्यान 27 सदस्यीय EU च्या नेत्यांना संबोधित करतील. युक्रेनला लष्करी मदत देण्याच्या पुढच्या टप्प्यावरही ते चर्चा करू शकतात.' बायडन ब्रुसेल्सहून पोलंडला रवाना होतील. तिथं ते नाटो प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी मदत करणार्या यूएस सैन्यांशी आणि मानवतावादी मदतीमध्ये गुंतलेल्या तज्ज्ञांनाही भेटतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Joe biden, Russia Ukraine, War