मराठी बातम्या /बातम्या /विदेश /रणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर

रणरणतं ऊन आणि थंडगार बर्फ; चक्क वाळवंटात पसरली बर्फाची चादर

सध्या सहारा वाळवंटात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तिथल्या वाळूच्या डोंगरावर बर्फाची  चादर पसरल्याचं चित्र समोर आलं आहे. ही घटना सध्याच्या नैसर्गिक बदलांमुळे झाली आहे.

सध्या सहारा वाळवंटात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तिथल्या वाळूच्या डोंगरावर बर्फाची चादर पसरल्याचं चित्र समोर आलं आहे. ही घटना सध्याच्या नैसर्गिक बदलांमुळे झाली आहे.

सध्या सहारा वाळवंटात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तिथल्या वाळूच्या डोंगरावर बर्फाची चादर पसरल्याचं चित्र समोर आलं आहे. ही घटना सध्याच्या नैसर्गिक बदलांमुळे झाली आहे.

नवी दिल्ली , 20 जानेवारी : 2020 मध्ये आणि 2021 च्या सुरुवातीला जगाने अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे संकटात आहे तर दुसरीकडे हमावामाच्या बदलामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना म्हणजे जगातील सर्वांत उष्ण वाळवंट अशी ओळख असलेल्या सहारा वाळवंटात (Sahara desert) बर्फाची चादर पसरली आहे. याठिकाणी वातावरणातील बदलामुळे (climate change) बर्फवृष्टी होत आहे.

उत्तर अफ्रिकेत सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. याठिकाणी सगळीकडेच बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. सहारा वाळवंटातील सध्याचे तापमान उणे 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. इतर वेळी असह्य उष्णता आणि लांबच लांब पसरलेल्या वाळूच्या डोंगरावर सध्या बर्फाची चादर आहे. पिवळसर रंगाच्या वाळूवर पांढरा शुभ्र बर्फ पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

सहारा वाळवंटात बर्फाची चादर पसरल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्थानिक फोटोग्राफर करीम बाऊचेटाने हे फोटो काढले आहेत. त्याने 13 जानेवारीला अल्जेरियातील वाळवंटी भाग असलेल्या ऐन सेफ्रा (Ain Sefra) शहरामध्ये बर्फाची चादर पसरलेले फोटो काढले होते. याठिकाणी तापमान उणे 3 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाले होते. ऐन सेफ्राला वाळवंटातील प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते. हे समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर आहे आणि या शहराला एटल्स पर्वतरांगांनी घेरले आहे.

View this post on Instagram

A post shared by Karim Bouchetata (@kaaarimo)

View this post on Instagram

A post shared by Karim Bouchetata (@kaaarimo)

सहारा वाळवंटात बर्फवृष्टी (snowfall) होण्याची ही दुर्मीळ घटना आहे. पण याठिकाणी बर्फवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अनेकदा बर्फवृष्टी झाली आहे. हा अत्यंत उष्ण आणि कोरडा प्रदेश आहे. सहार वाळवंटात बर्फवृष्टी होण्याची ही दुर्मीळ घटना 42 वर्षांमध्ये चौथ्यांदा घडली आहे. उत्तर अफ्रिकेचा मोठ्या प्रमाणात भाग सहारा वाळवंटाने घेरला आहे. या ठिकाणच्या उष्ण तापमानामुळे हा भाग हजारो वर्षांपासून चर्चेमध्ये आहे.

(हे वाचा-22 वर्षांनी पाहिला बायकोचा NO MAKEUP लूक; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया)

सहारा वाळवंट 3,600,000 चौरस मैल क्षेत्रफळात व्यापलेले आहे. अमेरिकेचा जवळपास आकार एवढा आहे. ऐन सेफ्रा या सहारा वाळवंटातील शहरामध्ये बर्फवृष्टीची पहिली घटना 1979 साली घडली होती. त्यानंतर डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2018 मध्ये याठिकाणी बर्फवृष्टी झाली. त्यावेळी सहार वाळवंटावर 16 इंच जाडीचा बर्फाचा थर पसरला होता. 2016 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीला लँडसेट 7 सॅटेलाईटद्वारे 19 डिसेंबर 2016 मध्ये कॅप्चर करण्यात आले होते. तर 2018 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीचे फोटो करीम बाऊचेटा या फोटोग्राफरने 7 जानेवारीला काढले होते.

(हे वाचा-Love Story : कमला हॅरिस यांच्या पतीने Blind Date चा अनुभव केला शेअर)

सहार वाळवंटात साधारणत: तापमान 25 ते 30  डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असते. पण यावेळी हवामान बदलामुळे याठिकाणचे तापमान उणे 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. नेहमी उष्ण वातावरणात राहणाऱ्या येथील नागरिकांना अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीचा सामना करावा लागला. तसंच अचानक झालेल्या बर्फवृष्टीमध्ये याठिकाणी प्रशासनाला उपाययोजना करता आल्या नाहीत. याठिकाणचे रस्ते बर्फमय झाले होते. त्यामुळे कार आणि बसेस रस्त्यांमध्ये अडकल्या होत्या.

First published:

Tags: Sahara, Snow