जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कमला हॅरिस यांच्या पतीने Blind Date चा अनुभव केला शेअर; US च्या पॉवरफुल महिलेची अनोखी Love Story

कमला हॅरिस यांच्या पतीने Blind Date चा अनुभव केला शेअर; US च्या पॉवरफुल महिलेची अनोखी Love Story

कमला हॅरिस यांच्या पतीने Blind Date चा अनुभव केला शेअर; US च्या पॉवरफुल महिलेची अनोखी Love Story

सामान्यपणे अमेरिकेतील राजकारणात राजकारणी आणि त्याचा जोडीदार हे नातं खूपच पारंपरिक पद्धतीचं असतं पण हॅरिस आणि डग्लस एमहाफ या दोघांनी हा स्टिरिओटाइप मोडून एकमेकांना पूरक भूमिका घेत भक्कम पाठिंबा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन. 20 जानेवारी : कमला हॅरिस (kamala harris) लवकरच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचा (Vice President of US) कार्यभार स्वीकारणार आहेत. कमला हॅरिस अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष, पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष असणार आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत त्यांचे पती डग्लस एमहाफ यांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एमहाफ हे व्यवसायाने वकील आहेत. डग्लस एमहाफ (Douglas Emhoff) यांना ‘सेकंड जेंटलमॅन’ (Second Gentleman) नावाने आपले अधिकृत ट्विटर हँडल मिळाल्यानंतर तर ते अधिक चर्चेत आले आहेत. शपथविधी झाल्यानंतर कमला या सेकंड लेडी ऑफ अमेरिका होतील आणि त्यांचे पती एमहाफ सेकंड जंटलमॅन ऑफ अमेरिका होतील. कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ रविवारी सकाळी सीबीएस न्यूजला (CBS News) मुलाखत देण्यासाठी हजर झाले होते. या मुलाखतीमध्ये दोघांनी आपल्या नातेसंबंधासह बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीदरम्यान काढलेले काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत डग्लस एमहाफ यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीकडून हे माहिती होतं की आपल्या पहिल्या ब्लाइंड डेट आधी तिने गूगल सर्च केलं होतं.’ हे ही वाचा- ना सेलिब्रिटी, ना करोडपती; तरी ‘तो’ सोबत यावा म्हणून लोक उधळतात हजारो रुपये कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ यांची ओळख 2013 मध्ये झाली होती. दोघांच्या देखील एका जवळच्या मित्राच्या ब्लाईंड डेटवेळी कमला आणि एमहाफ यांची ओळख झाली होती. एका वर्षाने 2014 मध्ये एमहाफ यांनी कमला हॅरिस यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कमला हॅरिस यांनी त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर 2014 ध्येच त्यांनी लग्न केले. एमहाफ यांचं कमला यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. त्यांची आधीची पत्नी क्रिस्टिन मैकिन हिच्यासोबत घटस्फोट झालाय. पहिल्या पत्नीपासून एमहाफ यांना दोन मुलं आहेत. सामान्यपणे अमेरिकेतील राजकारणात राजकारणी आणि त्याचा जोडीदार हे नातं खूपच पारंपरिक पद्धतीचं असतं पण हॅरिस आणि डग्लस एमहाफ या दोघांनी हा स्टिरिओटाइप मोडून एकमेकांना पूरक भूमिका घेत भक्कम पाठिंबा दिला आहे. कमला हॅरिस यांचे पती एमहाफ त्यांची इतकी काळजी घेतात की, 2019 मध्ये सॅन फ्रॅान्सिसकोमध्ये मूव्ह ऑन बिग आयडियाज फोरममध्ये कमला हॅरिस जनतेला मार्गदर्शन करत होत्या. इतक्यात एकाने त्यांच्या हातातील मायक्रोफोन हिसकावून घेतला. हे बघून डग्लस एमहाफ लगेच मध्ये पडले होते. नंतर कमला यांनी श्रोत्यांना सांगितलं की त्या व्यवस्थित आहेत त्यांना काहीही झालेले नाही. आपल्या पत्नीच्या मदतीसाठी डग्लस एमहाफ नेहमी पुढे असतात. एमहाफ यांनी आपल्या पत्नीसाठी वकीली सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. सेकंड जेंटलमन म्हणून व्हाइट हाऊसच्या कर्तव्याची जबाबदारी घेण्याची घोषणा केली जाईल त्यावेळी ते वकिली सोडणार आहेत. कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एमहाफ यांनी जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीत (Georgetown University) कायद्याचा शिक्षक म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. हे ही वाचा- अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं स्विकारताना कमला हॅरिस नेसणार साडी? कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ या दोघांनी सोशल मीडियावर स्वत:बद्दल आणि आपल्या नात्याबद्दल लिहिताना कधीच मागे पुढे पाहिले नाही. गेल्या वर्षी एमहाफच्या वाढदिवशी कमला हॅरिसने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, ‘आमच्या पहिल्या डेटनंतरची सकाळ. डग्लस एमहाफने मला पुढच्या काही महिन्यांसाठी आपल्या उपलब्ध तारखांची यादी ईमेल केली आहे. तो म्हणाला की, आम्ही हे कार्य करू शकू की नाही हे मला पहायचे आहे. तेव्हापासून आम्ही हे कार्य करत आहोत.’ ऐवढेच नाही तर डग्लस एमहाफ देखील सोशल मीडियावर दोघांच्या प्रेमाबाबत लिहित असतात. आपल्या नात्याबद्दल सांगताना हॅरिसला भेटल्यानंतर पहिल्याच नजरेत प्रेम झाले असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. पहिल्या ब्लाइड डेटनंतर दोघांना आपण एकत्र राहू शकतो असे वाटले. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा येथील एका कोर्टात लग्न केले. सीबीएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये कमला हॅरिस यांनी पती डग्लस एमहाफ यांच्याबद्दल सांगितले की, ‘डग्लस पूर्णपणे प्रामाणिक आहे. ज्या गोष्टीची त्याला काळजी वाटते त्याबद्दल तो स्पष्ट आहे… आपले कुटुंब आणि काम याची तो खूप काळजी घेतो.’ या मुलाखतीमध्ये कमला आणि डग्लस यांनी हे देखील सांगितले की, त्यांचे नातेवाईक जगभरात आहे. भारतात काही नातेवाईक आहेत तर काही अमेरिका आणि इटलीमध्ये आहेत. दरम्यान, कमला हॅरिस यांचे पती डग्लस एमहाफ यांना ‘सेकंड जेंटलमॅन’ नावाने अधिकृत ट्विटर हँडल मिळाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्यांच्या फॉलोअर्समध्ये जवळपास ५.५ लाखांनी वाढ झालीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात