22 वर्षांत पहिल्यांदाच NO MAKEUP लूकमध्ये दिसली बायको; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया

22 वर्षांत पहिल्यांदाच NO MAKEUP लूकमध्ये दिसली बायको; नवऱ्यानं दिली धक्कादायक प्रतिक्रिया

गेली 22 वर्षे ती न चुकता दररोज संपूर्ण Makeup करते. पण आता तिला याचा कंटाळा येऊ लागला आणि तिनं एक दिवस मेकअप न करण्याचा निर्णय घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : पुरुषप्रधान संस्कृतीत खूप मेकअप (Make up) करणाऱ्या महिलांची थट्टा केली जाते आणि कमी किंवा अजिबात मेकअप न करणाऱ्या महिलांचीही टिंगल केली जाते. मेकअप करणं ही सर्वस्वी वैयक्तिक आवडीची बाब असूनही लोकांसाठी ती चर्चेचा विषय असते.

लिपस्टिकचा (Lipstic) हलकासा थर, काजळाची बारीक रेघ (Line of Kohl) या मेकअपमधील अगदी मूलभूत गोष्टी आहेत. जेव्हा हातात पुरेसा वेळ असतो किंवा काही खास कार्यक्रम असतो तेव्हा महिला वेळ घालवून खास मेकअप करण्याचा विचार करतात. परंतु एखादी महिला स्वतःची इच्छा नसतानादेखील रोज तासभर वेळ घालवून मेकअप करत असेल, तर तिच्यासाठी ते किती कठीण जात असेल. अशीच एक महिला तिला आवडत नसूनही फक्त नवऱ्यासाठी ती गेली 22 वर्षे न चुकता दररोज संपूर्ण मेकअप करत आहे.

गेल्या 22 वर्षांपासून ही विवाहित महिला आजारपण आणि सहली यांचे दिवस वगळता रोज  सकाळी लवकर उठून अंघोळ करून तासभर वेळ मेकअप आणि केशरचनेसाठी घालवावा लागतो. आता तब्बल 22 वर्षांनंतर  तिला याचा अतिशय कंटाळा आला असून, आता ती हे करू शकत नाही असं तिला वाटत आहे.

हे वाचा - साढसा रडली आणि निघाला मेकअप; नवरीचं खरं रूप दिसताच नवऱ्यानं काय केलं पाहा VIDEO

ही एका सोशल मीडिया साइटवरची जुनी पोस्ट आहे.‘स्लेट डॉट कॉम’च्या सल्ला स्तंभात तिनं आपली ही समस्या मांडली. ती म्हणते, "आता मला रोज मेकअप करण्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे मी सध्या फक्त रविवारी मेकअप करायचा बंद केलं आहे. तरीही मी गबाळी राहत नाही. मी मॉइश्चरायझर लावते, केस नीट बांधते आणि ट्रॅक सूट किंवा इतर साधे कपडे घालते. बाहेर फिरत असताना आजूबाजूला असलेल्या महिलांपैकी निम्म्या महिलांमध्ये मी उठून दिसते, तरीही माझ्या नवऱ्याला मेकअपविना एक रविवारदेखील आवडत नाही"

रविवारी मेकअप न करण्याची तिची ही सुरुवात म्हणजे तिच्यातील उत्साह कमी होत असल्याची लक्षणं आहेत, असं तिच्या नवऱ्याला वाटतं. हळूहळू ती एक अजागळ, गबाळी महिला बनेल, असं त्याला वाटतं. रविवारचा तिचा लूक सेक्सी नाही. शनिवार, रविवार जेव्हा तो दाढी करत नाही  तेव्हा तो सेक्सी दिसतो, असं मी त्याला सांगते. पण त्याला मात्र माझं नवीन रूप सेक्सी वाटत नाही, असंही तिनं या स्तंभात आपली कैफियत मांडताना लिहिलं आहे.

हे वाचा - मलायका अरोराने शेअर केल्या सिक्रेट Yoga Tips; तिने सांगितलेली आसनं करून पाहा

अजूनही तिचं मेकअपचं रूटीन पूर्णपणे बदललेलं नसलं तरी अंगणात काम करणं किंवा किराणा दुकानात जाणं एवढ्यासाठी इतका वेळ मेकअपला देणं म्हणजे तो वेळ वाया घालवणं, असं तिला वाटतं. तरीही तिचा नवरा तिला रोज संपूर्ण मेकअप करण्याचा आग्रह करतो किंवा त्यासाठी दबाव आणतो, एक दिवसही तिनं त्यातून सूट घेतलेली त्याला आवडत नाही, हे तिला खूप त्रासदायक ठरत आहे. नवऱ्याची ही अरेरावी, अट्टाहास तिला असह्य होत आहे, असं या महिलेनं लिहिलं आहे.

Published by: Aditya Thube
First published: January 20, 2021, 7:44 AM IST

ताज्या बातम्या