मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Ukraine: रशियन सैनिकांकडून किशोरवयीन मुलींसोबत सैतानी कृत्य, वाचलं तरी अंगावर येईल काटा

Ukraine: रशियन सैनिकांकडून किशोरवयीन मुलींसोबत सैतानी कृत्य, वाचलं तरी अंगावर येईल काटा

 रशियन सैनिक आता युक्रेनमधील 10 वर्षांच्या मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवत त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी या सैनिकांनी तेथील महिलांवर लैंगिक अत्याचार केले.

रशियन सैनिक आता युक्रेनमधील 10 वर्षांच्या मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवत त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी या सैनिकांनी तेथील महिलांवर लैंगिक अत्याचार केले.

रशियन सैनिक आता युक्रेनमधील 10 वर्षांच्या मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवत त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी या सैनिकांनी तेथील महिलांवर लैंगिक अत्याचार केले.

कीव, 29 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमध्ये (russia ukraine war ) दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. एकीकडे या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या बॉम्बहल्ल्यात (bomb attack) सामान्य लोकांचा जीव गेल्याच्या बातम्या येत होत्या. तर दुसरीकडे सामान्य लोकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या आणि खुनांच्या घटनाही समोर येत होत्या. मात्र, आता यात आणखी भयंकर प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. रशियन सैनिक आता युक्रेनमधील 10 वर्षांच्या मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवत त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचं समोर आलं आहे.

याआधी या सैनिकांनी तेथील महिलांवर लैंगिक अत्याचार केले. तसंच, त्यांचे खून करण्यापूर्वी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. मात्र आता निष्पाप मुलींसोबत क्रूर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्या ऐकून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहील.

मुलीवर अत्याचार होत असताना पालक हतबल

DAN हिंदीच्या बातमीनुसार, पाच रशियन सैनिकांनी 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ती मुलगी गरोदर राहिली. या मुलीवर इतका भयंकर अत्याचार झाला होता की, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, जर गर्भपात केला तर मुलगी पुन्हा कधीच आई बनू शकणार नाही, मुलाला जन्म देऊ शकणार नाही. त्यामुळे नाईलाजाने मुलीच्या पालकांना गर्भपाताचा निर्णय मागे घ्यावा लागला.

(हे वाचा - जोडी जमली! बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी एकाच खात्यात आले एकत्र, काय आहे कारण)

 

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, पीडित मुलगी युक्रेनच्या बुचा शहराची रहिवासी आहे. तिची कथा मानसशास्त्रज्ञ ओलेक्झांड्रा क्विट्को (Oleksandra Kvitko) यांनी सांगितली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्या पीडितेला तिच्या पालकांच्या संमतीने मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी मदत करत आहेत. डीएनए हिंदीनुसार, या डॉक्टर सध्या 14 ते 18 वयोगटातील आणखी पाच मुलींचं समुपदेशन करत आहेत. या मुलीही रशियन सैनिकांनी बलात्कार केल्यानंतर गर्भवती झाल्याचा आरोप आहे. या डॉक्टर ज्या सर्वात लहान पीडित मुलीला मदत करत आहेत, ती फक्त 10 वर्षांची आहे.

(हे वाचा - दोन मुलांची आई होती Shari Baloch, पाक आणि चीनला आव्हान देणारी Suicide Bomber)

पुरुषांचेही शोषण

डॉक्टरांनी रेडिओ स्वोबोडाला सांगितलं की, 14, 15 आणि 16 वयोगटातील अनेक मुलींवर आतापर्यंत बलात्कार झाला आहे. रशियन सैनिकांच्या चुकीच्या कृत्यांमुळे युक्रेनमधील अनेक किशोरवयीन मुली गर्भवती झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. युक्रेनमधील लैंगिक गुन्ह्यांमध्ये पीडित महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. रशियन सैनिकांच्या या अमानुष वागणुकीवर जगभरातील देशांमध्ये निषेध केला जात आहे.

First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news