इस्लामाबाद, 27 एप्रिल : पाकिस्तानच्या प्रमुख राजकीय घराण्याचे वंशज, बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी बुधवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रिपदाची (Pakistan's Foreign Minister) शपथ घेतली आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी 33 वर्षीय बिलावल यांना आयवान-ए-सदर (राष्ट्रपती भवन) येथे एका साध्या समारंभात शपथ दिली. या वेळी, पंतप्रधान शाहबाज, माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि इतर अधिकारी तसंच पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते (पीपीपी) उपस्थित होते.
बिलावल आणि हिना एकाच खात्यात
बिलावल यांना पहिल्यांदाच सरकारमध्ये महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे आणि देशाच्या परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2018 मध्ये ते पहिल्यांदा नॅशनल असेंब्लीवर निवडून आले होते. याआधी याच पदावर फेब्रुवारी 2011 ते मार्च 2013 पर्यंत पक्षाच्या महिला नेत्या हिना रब्बानी खार यांनी काम केलं होतं. आता हिना याच खात्याच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आहेत. बिलावल आणि हिना एकाच खात्यात आल्यामुळे पुन्हा एकदा दोघेजण चर्चेत आले आहेत.
2012 मध्ये एका बांग्लादेशी वृत्तपत्राचा दावा
एका बांग्लादेशी वृत्तपत्राने 2012 मध्ये दावा केला होता की, बिलावल भुट्टो हे हिना रब्बानी खार (Hina Rabbani Khar) यांच्या प्रेमात बुडालेले आहेत, ज्या त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या आहेत आणि विवाहित आहेत. हिना रब्बानी खार यांचं लग्न पाकिस्तानातील मोठे उद्योगपती फिरोज गुलजार यांच्याशी झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत.
पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी हिना रब्बानी खार आणि त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानी राष्ट्रपती भवनात आपत्तीजनक स्थितीत पकडलं होतं. त्यावेळी बिलावल भुट्टो राष्ट्रपती भवनात राहत होते. आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्यानंतर राष्ट्रपती भवनात गदारोळ झाला. मात्र, ही बाब अत्यंत सावधगिरीने दाबण्यात आली, असं याच वृत्तपत्रानं म्हटलं होतं.
या वृत्तपत्रानं गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, हिना रब्बानी खारही बिलावल भुट्टोंच्या प्रेमात पडल्या होत्या आणि त्यांनी बिलावलसाठी त्यांचा करोडपती पती फिरोज गुलजार यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानातील काही मौलवींनी हिना रब्बानी यांच्याविरोधात फतवा काढण्याची भीती दाखवली होती. मात्र, त्यांनी मौलवींचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला. राजकीय कुटुंबांच्या वाढत्या दबावामुळे अखेरीस हिना आणि बिलावल वेगळे झाले.
सोशल मीडियावर ट्रेंड
पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशमधील लोकांनी बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी यांच्यातील संबंधांबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्यावेळी हिना रब्बानी या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि वाद वाढल्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र, हिना रब्बानीला भारतातून खूप मोठा पाठिंबा देण्यात आला आणि 2012 मध्ये हिना रब्बानीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ट्रेंड चालवले गेले आणि हिना रब्बानींनी बिलावलशी लग्न करावं, असं म्हटलं गेलं.
हे वाचा - Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ल्याचा VIDEO
बिलावल यांची ओळख आणि घराण्याचा राजकीय इतिहास
बिलावल हे तीन वेळच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आहेत. बेनझीर यांची 2007 मध्ये रावळपिंडी येथे एका राजकीय सभेत बॉम्ब आणि बंदुकीच्या हल्ल्यात हत्या झाली होती. त्या माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची मुलगी होत्या.
जनरल झियाउल हक यांनी मार्शल लॉ लागू केल्यावर 1977 मध्ये लष्कराने झुल्फिकार यांना पदच्युत केले. त्याच्यावर एका खुनाच्या खटल्यात कट रचल्याचा खटला चालवला गेला आणि 1979 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. बेनझीरसह झुल्फिकार यांच्या चार मुलांपैकी तीन मुलांना हिंसकपणे ठार मारण्यात आलं, ज्यामुळे हे कुटुंब पाकिस्तानमधील सर्वात शोकग्रस्त राजकीय घराणं बनलं.
झुल्फिकार यांनी 1960 च्या दशकात परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. बिलावल यांनीही सर्वांत प्रथम परराष्ट्र खात्याचीच जबाबदारी स्वीकारली आहे. हे आजोबा-नातवामध्ये विचित्र साम्य आहे.
हे वाचा - किळसवाणं! तब्बल 30 वर्ष रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवत होते समोसे आणि स्नॅक्स
बिलावल यांच्यावर या जबाबदाऱ्या
बिलावल यांची बहीण बख्तावर भुट्टो-झरदारी यांनी आदल्या दिवशी देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं आहे. एका निर्णायक वळणावर ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख बनले आहेत, जेव्हा पाकिस्तानला परराष्ट्र धोरण चालवण्यासाठी स्थिर हाताची गरज होती. त्यांच्यासमोर असलेल्या मुख्य आव्हानांपैकी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या षड्यंत्राच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी ताणलेले संबंध सुधारणे आणि शेजारील भारताबरोबरची शांतता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग शोधणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Love story, Pakistan, Pakistan love, Women extramarital affair