नवी दिल्ली, 27 एप्रिल : पाकिस्तानातल्या कराची युनिव्हर्सिटीत चिनी नागरिकांवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला (Karachi University Blast) करून पाकिस्तान आणि चीनला आव्हान देणाऱ्या महिलेचं नाव शारी बलोच (BLA Suicide Bomber Shari Baloch) असल्याचं समोर आलं आहे. या बॉम्ब हल्ल्यात शारीसह आणखी तीन चिनी लोकांचा मृत्यू झाला (chinese killed in karachi blast). तिने चिनी भाषा केंद्राजवळ शेजारून एक चिनी लोकांची व्हॅन जात असताना स्वतःला उडवून दिलं. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) घेतली आहे. ही त्यांची पहिलीच महिला आत्मघातकी हल्लेखोर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शारी यांनी दोन महिने इराण आणि अफगाणिस्तानलाही बिझिनेस ट्रिप केली होती, असंही सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, शारी ही उच्चशिक्षित आणि चांगल्या परिवारातून आलेली महिला होती. तिचे पती डेंटिस्ट आणि लेक्चररही आहेत आणि वडील सरकारी कर्मचारी होते. पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी तिच्याविषयी मिळालेली माहिती पाकिस्तानी चॅनलशी शेअर केली आहे. ती बुरखा घालून उभी होती आणि तिच्या हातात एक बॅग होती. बॉम्ब फुटण्याआधीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला दिसत आहे.
शारी उच्चशिक्षित होती, तिने झूलॉजीमध्ये मास्टर्स केलं होतं. यासोबतच तिचा एम फिलचा (MPhil) अभ्यास सुरू होता. यासोबतच ती एका माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. “विद्यार्थी असताना शारी ‘बलूच विद्यार्थी संघटने’ची सदस्य होती. बलूच नरसंहार आणि बलुचिस्तानचा ताबा या घटनांची तिला जाणीव होती,” असंही बलूच लिबरेशन आर्मीच्या स्टेटमेंटमध्ये (BLA Statement) म्हटलं आहे.
हे वाचा - Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ल्याचा VIDEO
बलुचिस्तानच्या संघर्षाच्या इतिहासात शारीने एक मोठा अध्याय जोडला असल्याचं हल्लेखोर संघटनेनं म्हटलं आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्युनने म्हटलंय की, शारीने दुपारी 12:10ला तिच्या ट्विटरवरून तिच्या मित्रपरिवाराला 'गुडबाय' म्हटलं होतं. शारीच्या पतीनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं हबीतन बाशिर बलोच असं आहे. त्यांनी अज्ञात ठिकाणावरून ट्विट करत त्यांना आणि शारीला दोन मुले असल्याचं सांगितलं आहे. अफगाणिस्तानचे पत्रकार बाशिर अहमद ग्वाख यांनी हबीतन यांचं ट्विट शेअर केलं आहे. “शारी जान, तुझ्या या निःस्वार्थ कृत्यामुळे मी निशब्द झालो आहे. मात्र, मला तुझा अतिशय अभिमान वाटतो आहे. माहरोच आणि मीर हसन या दोघांनाही तुझ्याबद्दल गर्व वाटतो. तू कायमच आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राहशील,” असं यात म्हटलं आहे. बशीर यांच्या ट्विटमधील माहितीनुसार, शारी दोन वर्षांपूर्वी बलूच लिबरेशन आर्मीमध्ये सहभागी झाली होती. तसंच तिने या आत्मघातकी हल्ल्यासाठी स्वतःच पुढाकार घेतला होता.
हे वाचा - किळसवाणं! तब्बल 30 वर्ष रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवत होते समोसे आणि स्नॅक्स
या ट्विटसोबत त्याने त्याच्या कुटुंबाचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये हबितान, शारी, त्यांची आठ वर्षांची मुलगी माहरोश आणि चार वर्षांचा मुलगा मीर हसन हे दिसत आहेत. उच्चशिक्षित आणि कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसलेल्या एखाद्या कुटुंबातून अशा प्रकारचा हल्ला, आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया येणे हे बलुचिस्तानमधील युवा पिढीबाबत बरंच काही सांगून जातं, असं मत पत्रकार बशीर अहमद ग्वाख यांनी आपल्या ट्विट्समधून व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, China, Pakistan