मॉस्को, 06 एप्रिल: गेल्या दोन दशकांपासून रशियात प्रशासन असणाऱ्या व्लादिमीर पुतीनसाठी (Vladimir Putin) आता आणखी टर्म सत्तेवर (Two terms more) राहण्यासाठीचा रस्ता मोकळा केला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी एक नवीन कायदा पारित (passed new law) केला असून त्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता पुतीन पुढील दोन टर्म अर्थातच 2036 पर्यंत ते राष्ट्रपती पदावर कायम राहू शकतात. गेल्या काही दिवसांपासून रशियन लोकांमध्ये राष्ट्रपती पुतीनविरोधात रोष वाढत चालला आहे, अशात हा नवा कायदा पारित केल्यानं रशियात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.
रशियन संविधानात सुधारणा करण्याचा एक भाग म्हणून पुतीन यांनी गेल्या वर्षी हा संबंधित विधेयक प्रस्तावित केला होता. जुलै महिन्यात अनेक रशियन लोकांनी यासाठी मतदान केलं होतं. गेल्या महिन्यात कायदेमंडळांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. खरंतर रशियामध्ये एखाद्या व्यक्तीला सलग दोनवेळाच राष्ट्रपती पदावर विराजमान होता येतं. त्यानंतर तिसऱ्या वेळी त्याला निवडणूका लढवता येत नाही. अशाच नियम अमेरिकेत देखील आहे. पण 2000 साली पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या पुतीन यांनी गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर कायम आहे. संबंधित कायद्यावर पुतीन यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या कायद्याची प्रत रशियाच्या अधिकृत वेब साइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(हे वाचा-महाराष्ट्रातला डबल म्युटंट कोरोना विषाणू अमेरिकेत आढळला; पहिल्या रुग्णाची नोंद)
सुरुवातीला रशियामध्ये निवडणूकीची एक टर्म चार वर्षांची होती. पण त्यानंतर 2000 ते 2008 दरम्यानच्या काळात त्यांनी टर्मचा कालावधी वाढवून घेतला आणि तो 6 वर्षापर्यंत वाढवला. त्यामुळे 2012 मध्ये तिसऱ्यांदा आणि 2018 मध्ये चौथ्यांदा सत्तेवर येऊ शकले. रशियन संविधानानुसार त्यांना 2024 सालची निवडणूक लढता येणं शक्य नव्हतं. पण या नवीन कायद्यानुसार पुतीन आणखी दोन टर्म निवडणूक लढवू शकतात. म्हणजेच 2036 पर्यंत ते कायम राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
(हे वाचा-कोरोना महासाथीमुळे नाही झाली तपासणी; 27 वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत)
68 वर्षीय पुतीन गेल्या गेल्या दोन दशकांपासून रशियाची सत्ता हाकत असले तरी, 2024 मध्ये निवडणूकीत उतरणार की नाही. याचा निर्णय अद्याप घेतला नाही. अलीकडेच रशियन क्रेमलिनचे विरोधी पक्षनेते अॅलेक्स नवेलनी यांना विष देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जवळपास पाच महिने जर्मनीत उपचार केल्यानंतर ते रशियात परतले होते. पण त्यांना विमानतळावरूनच अटक करण्यात आली. त्यानंतर रशियन नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून पुतीन प्रशासनाचा निषेध केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia