लंडन, 5 एप्रिल : ब्रिटेनमध्ये कोरोना महासाथीमुळे अनेकांचा जीव जात आहे. यादरम्यान अशा अन्य लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे, ज्यांना दुसऱ्याच आजाराची लागण झाली आहे. अशाच कारणामुळे लिजी इवांन्स नावाच्या तरुणीचा जीव गेला. तिची योग्य तपासणी झाली नाही आणि परिणामी चुकीच्या पद्धतीने तिच्यावर उपचार सुरू होता. यातच तिचा मृत्यू झाला.
लिजीला सर्व्हाइकल कॅन्सर होता. मात्र डॉक्टरांना वाटलं की, हा लवकरच्या मेनोपॉजचा परिणाम आहे. याआधीही तिला कॅन्सर झाला होता, त्यावेळी ती त्यातून सुखरुप बरी झाली होती. या महासाथीदरम्यान पुन्हा एकदा तिचा जुना आजार निर्माण झाला. जेव्हा तिला वेदना होत होत्या तेव्हा डॉक्टरांनी तिला मेनोपॉजसाठीचं औषधं देत होते.
लिजी इवान्स हिला चार मुलं आहेत. चौथ्या मुलाच्या जन्मानंतर समस्या वाढायला सुरुवात झाली होती. या महासाथीदरम्यान प्रत्येक प्रकारच्या तपासण्या करणे शक्य नव्हते. ज्यामुळे कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यात अनेक गोष्टी कळल्या नाहीत. जेव्हा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात पोहोचला तेव्हा याचा खुलासा झाला. लिजी वेल्स येथे राहाणारी होती. ती बगिल्ट भागात राहत होती. तिच्या चौथ्या मुलाचा जन्म ठरलेल्या वेळेच्या 8 आठवड्यांपूर्वी झाला होता. मात्र तिच्या आजाराबद्दल डॉक्टर अनभिज्ञ होते. एक वर्षांच्या आत तिचा आजार अधिक वाढला.
हे ही वाचा-Break The Chain : ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर;ऑफिस ते सोसायटी, काय होणार बदल?
लिजीचा मृत्यू 31 मार्च रोजी झाला. तिने मृत्यूपूर्वी सांगितलं की, ती यापूर्वीपर्यंत नियमित तपासणी करीत होती. या महासाथीमुळे ती तपास करू शकली नाही. तिच्या मुलांचं वय 9, 8, 2 आणि एक अशी आहेत. डेलीमेलच्या बातमीनुसार कोरोना महासाथीदरम्यान एकट्या इंग्लंडमध्ये कॅन्सरचे 35 हून अधिकाधिक प्रकरणं जीवघेणी असल्याचं समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Corona spread, England