लंडन, 30 मे: एक मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा (Britain's Spy Agency) असलेली MI6 च्या प्रमुखांनी सर्वात धक्कादायक आणि जगाला हादरा बसेल असा दावा केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांचं गंभीर आजारानं आधीच मृत्यू झाला असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे. इतकंच काय तर व्लादिमिर पुतीन यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती त्या ठिकाणी काम करते, असंही दाव्यात म्हटलं आहे.
ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळानं द डेली स्टारच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
Anti aging tips: वाढत्या वयातही चेहरा दिसेल तरुण; ही 5 एंटी एजिंग ब्युटी सीक्रेट्स जाणून घ्या
गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. त्याच काळात गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्येतही बिघडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला.
पुतीन यांच्यासारखी दिसणारी हुबेहुब व्यक्ती सांभाळते राज्यभार
MI6 च्या प्रमुखांनी दावा केला की, व्लादिमिर पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात आहे.
पुन्हा अमेरिका हादरलं..! भर फेस्टिव्हलमध्ये गोळीबाराचा थरार, महिलेचा मृत्यू
MI6 च्या प्रमुखांनी केलेला दावा ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळानं द डेली स्टारच्या हवाल्यानं प्रसिद्ध केला आहे.
पुतीन यांना गंभीर आजार
गेल्या काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर झाला असल्याचं म्हटलं जात होतं. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुतीन युद्धाच्या काळात सुट्टीवर जाणार होते. याकाळात त्यांचं एक ऑपरेशन होणार होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Vladimir putin