नवी दिल्ली, 30 मे : वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्वचेतील आर्द्रता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे त्वचेची लवचिकता आणि कोरडेपणा, डाग, पिगमेंटेशन, फ्रिकल्स, सुरकुत्या इ. दिसू लागतात. साधारणपणे, लोक त्वचा वृद्ध दिसण्याचे कारण जाणून न घेता उपाय करू लागतात. वयस्क दिसत जाणं टाळता येत नसलं, तरी त्वचा वयाच्या आधी जास्त वयस्क दिसत असेल तर याची अनेक कारणे असू शकतात. अनेकवेळा त्वचेची काळजी न घेतल्याने वयाच्या आधीच त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात, त्यानंतर अनेक वेळा आपण आपल्या आहाराबाबत निष्काळजी असतो आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर (Anti aging tips) होऊ लागतो.
कमी वयात एकदा का त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली की, ती पूर्वीसारखी तरुण-चमकदार करणे सोपे काम नसते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी योग्य वेळी लक्षात ठेवल्या, तर दीर्घकाळ आपण तरुण दिसू शकतो, त्याविषयी जाणून घेऊया 5 टिप्स.
अँटी एजिंग क्रीम कधी वापरावीत -
बरेच लोक वयाच्या 40 नंतर अँटी एजिंग गोष्टींचा वापर सुरू करतात, मात्र, वयाच्या 20 व्या वर्षांपासून ते सुरू करणे चांगले आहे. अँटी-एजिंग म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करणे. जर तुम्ही याची सुरुवात कमी वयापासूनच केली तर तुम्ही स्वतःला त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्यांपासून वाचवू शकता.
आहारात बेफिकीर राहू नका -
चांगल्या त्वचेसाठी चांगला आहार आवश्यक आहे. यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात फळे, भाज्या, प्रथिने आणि चांगली चरबी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. याशिवाय जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. तळलेल्या गोष्टींऐवजी घरचेच हेल्दी फूड खाल्ले तर बरे होईल.
हे वाचा -
जर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी!
अँटिऑक्सिडेंट आवश्यक -
त्वचेच्या पेशींसाठी अँटिऑक्सिडंट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून त्वचेच्या पेशींचे संरक्षण होते आणि नुकसान कमी करण्यात मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स घटक आहारात आणि स्कीन केअर प्रॉडक्ट म्हणून वापरू शकता.
सनस्क्रीन आवश्यक -
सनस्क्रीन तुम्हाला अकाली वृद्धत्वापासून वाचवते. त्वचेवर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान टाळते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
हे वाचा -
रक्तातील वाढलेलं Uric Acid लगेच कमी होईल; चमत्कारिक आहेत ही साधी वाटणारी 3 पाने
तणाव व्यवस्थापित करा -
तणाव त्वचेसोबतच आरोग्यासाठीही खूप धोकादायक आहे. यामुळे, असे काही हार्मोन्स शरीरात तयार होतात, नंतर ते त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे वाढवतात. त्यामुळे वृद्धत्वापासून दूर राहुन तरुण राहायचे असेल तर तणावापासून दूर राहून आनंदी राहावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.