Home /News /videsh /

अमेरिका हादरलं..! भर फेस्टिव्हलमध्ये गोळीबाराचा थरार; महिलेचा मृत्यू, 7 जखमी

अमेरिका हादरलं..! भर फेस्टिव्हलमध्ये गोळीबाराचा थरार; महिलेचा मृत्यू, 7 जखमी

अमेरिकेत (United States) पुन्हा एकदा गोळीबाराची (shooting) घटना समोर आली आहे.

    वॉशिंग्टन, 30 मे: अमेरिकेत (United States) पुन्हा एकदा गोळीबाराची (shooting) घटना समोर आली आहे. यूएस मीडियाच्या वृत्तानुसार (US media reports) , रविवारी ओक्लाहोमामध्ये एका आऊटडोर मेमोरियल डे (Memorial Day festival) फेस्टिव्हलमध्ये गोळीबार झाला, त्यात 1 ठार आणि 7 जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सुमारे 1,500 लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. ओक्लाहोमा स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने एका निवेदनात म्हटलं आहे की गोळीबाराच्या घटनेत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर इतर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. OSBI च्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या स्कायलर बकनरसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते आणि त्याने रविवारी दुपारी मस्कोगी काउंटी शेरीफ कार्यालयात स्वतःला हजर केलं. एका अहवालानुसार, यापूर्वी अमेरिकेत झालेल्या गोळीबाराच्या विविध घटनांमध्ये 17000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 640 मुलांचा समावेश आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार? गायक मुसेवालाची हत्या TOP बातम्या OSBI ने सांगितले की, तुलसाच्या आग्नेयेला सुमारे 45 मैल (72 किलोमीटर) टॅफ्ट येथे मेमोरियल डे कार्यक्रमात झालेल्या गोळीबारातील जखमी 9 ते 56 वयोगटातील आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी काही लोकांमध्ये वाद झाल्याचे साक्षीदारांनी एजन्सीला सांगितले. टॅफ्ट्स बूट्स कॅफेचे मालक सिल्व्हिया विल्सन यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला फोन कॉलवर सांगितले की, "आम्ही बंदुकीच्या अनेक गोळ्यांचा आवाज ऐकला आणि आम्हाला वाटले की ते फटाके आहेत." मग लोकं आपला जीव वाचण्यासाठी धावू लागले. सगळ्यांकडे आरडाओरड सुरु होती. टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 19 मुलांचा मृत्यू 25 मे रोजी टेक्सासमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली, ज्याने संपूर्ण अमेरिका हादरली. उवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये 18 वर्षीय साल्वाडोर रामोस याने ऑटोमेटिक बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ठार केले. शाळेत घटना घडण्यापूर्वीच त्याने घरातच आजीची हत्या केली होती. या गोळीबारात 13 मुले, शाळेचे कर्मचारी आणि काही पोलीस जखमी झाले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: America

    पुढील बातम्या