Home /News /viral /

आईने दिला तिळ्या मुलींना जन्म, तरीही तिसरी बहीण मोठ्या दोघींहून 4 वर्षांनी लहान! कसं घडलं हे?

आईने दिला तिळ्या मुलींना जन्म, तरीही तिसरी बहीण मोठ्या दोघींहून 4 वर्षांनी लहान! कसं घडलं हे?

Triplet having 4 Years Difference in Age : एखाद्या महिलेनं तिळ्यांना जन्म दिला आणि त्यातलं एक मूल आणि इतर दोघांच्या वयात काही वर्षांचा फरक असल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, जुळ्या किंवा तिळ्या मुलांच्या वयात केवळ काही मिनिटांचा फरक असू शकतो. पण एखाद्या महिलेनं तिळ्यांना जन्म दिला आणि त्यातलं एक मूल आणि इतर दोघांच्या वयात काही वर्षांचा फरक असल्याचं (Triplet having 4 Years Difference in Age) तुम्ही कधी ऐकलंय का? असाच प्रकार एका महिलेसोबत घडलाय. या महिलेला आणखी दोन बहिणी आहेत. या तिघी जणी तिळ्या आहेत. मात्र, यातल्या मोठ्या दोघी बहिणींचा जन्म एकाच दिवशी काही मिनिटांच्या फरकानं झालाय. तर या महिलेचा जन्म तिच्या बहिणींच्या नंतर तब्बल 4 वर्षांनी झालाय. मग यांना तिळ्या कसं म्हणायचं, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. ही घटना म्हणजे काही आश्चर्य नव्हे. तरीही या तिसऱ्या बहिणीच्या जन्माविषयी जो प्रकार घडलाय तो वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने थोडासा आश्चर्यकारक आहेच. या महिलेनं तिच्या आणि तिच्या बहिणींच्या जन्माची रंजक गोष्ट Tiktok वर सांगितलीय. आईने आयव्हीएफद्वारे दिला होता मुलींना जन्म या महिलेचं नाव शेल्बी असून तिनं हा मजेशीर किस्सा शेअर केलाय. तिच्या आईने आयव्हीएफद्वारे तीनही मुलींना जन्म दिला आहे. ही आयव्हीएफ ट्रीटमेंट घेताना स्त्री आणि पुरुषाच्या (होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्या) शरीरातून बीजं आणि वीर्य घेतले जातात. याच्या आधारे लॅबमध्ये भ्रूण तयार केले जातात. या तयार झालेल्या भ्रूणांचं स्त्रीच्या गर्भात रोपण करून त्या भ्रूणाद्वारे मुलांना जन्म दिला जातो. @maximumstrengthpepto नावाच्या Tiktok वर तिची कथा शेअर करताना शेल्बीने सांगितलं की, आईने जेव्हा आयव्हीएफ ट्रीटमेंट घेतली तेव्हा तयार झालेल्या भ्रूणांपासून शेल्बीच्या आईला पहिल्या दोन मुली झाल्या. तर, राहिलेले भ्रूण गोठवून ठेवण्यात आले. यानंतर दोन-तीन वर्षांनी या राहिलेल्या भ्रूणाद्वारे पुन्हा मूल जन्माला घालण्याची शेल्बीच्या आई-वडिलांची इच्छा झाली. मात्र, इतके महिने फ्रीजमध्ये राहिलेल्या भ्रूणापासून (frozen embryo) मूल जन्माला येईल की नाही, याविषयी डॉक्टर साशंक होते. पण त्यांनी तरीही तसा प्रयत्न केला. गोठविलेल्या गर्भातून 4 वर्षांनी जन्मलेली मुलगी डॉक्टरांनी सांगितलं की, वर्षानुवर्षे गोठवलेल्या भ्रूणातून मूल जन्माला येणं अवघड आहे. तथापि, आम्ही त्यावर योग्य प्रकारे काम केले आणि काही महिन्यांनंतर शेल्बीच्या आईने तिला जन्म दिला. डॉक्टरांसाठीही हा चमत्कारच होता, कारण गोठलेले भ्रूण फार काळ टिकत नाहीत. शेल्बी आणि तिच्या बहिणी कोर्टनी आणि बेका या तांत्रिकदृष्ट्या तिळ्या (technically triplet) आहेत. कारण, या सर्वांचे भ्रूण एकाच वेळी तयार झाले होते. परंतु, शेल्बीचा जन्म नंतर झाल्यामुळे ती तिच्या बहिणींपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Pregnancy, Women

    पुढील बातम्या