जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / रशिया मारियुपोल काबीज करण्याच्या जवळ! युक्रेनियन सैन्याच्या शेवटच्या गडावर पुन्हा हवाई हल्ले

रशिया मारियुपोल काबीज करण्याच्या जवळ! युक्रेनियन सैन्याच्या शेवटच्या गडावर पुन्हा हवाई हल्ले

रशिया मारियुपोल काबीज करण्याच्या जवळ! युक्रेनियन सैन्याच्या शेवटच्या गडावर पुन्हा हवाई हल्ले

Ukraine-Russia War: सगळीकडून विरोध झाल्यानंतरही रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष सुरूच आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कीव, 23 एप्रिल : युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेला लष्करी संघर्ष (Ukraine-Russia War) आता शिगेला पोहोचला आहे. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या सल्लागारानं म्हटलं आहे की, रशियन सैन्य युक्रेनियन सैन्याचा शेवटचा गड असलेल्या मारियुपोल  (russian airstrikes in mariupol) या युक्रेनियन बंदर शहरातील स्टील प्लांटवर हल्ला करत आहेत. ओलेक्सिएव्ह एरास्टोविच यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, रशियन सैन्यानं अजोव्स्टलवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले आहेत. “शत्रू अजोव्स्टल भागातील मारियुपोलच्या बचावकर्त्यांचा प्रतिकार पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपूर्वी रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितलं की, रशियन लोकांनी अझोव्स्टल वगळता सर्व मारियुपोल हस्तगत केलं आहे. दरम्यान, पुतिन यांनी रशियन सैन्याला प्लांटवर हल्ला करू नये आणि त्याऐवजी त्याच्याशी बाह्य संपर्क तोडण्याचे आदेश दिले. युक्रेनियन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की, त्यांचे सुमारे 2,000 सैनिक प्लांटमध्ये आहेत आणि सुमारे 1,000 प्लांटच्या भूमिगत बोगद्यांमध्ये आश्रय घेत आहेत.

एर्स्टोविच म्हणाले की, युक्रेनियन सैन्य रशियन सैन्याशी पूर्ण ताकदीने लढत आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या लुहान्स्क प्रदेशाच्या गव्हर्नरने शनिवारी संध्याकाळी सांगितलं की, झोलोट शहरावर रशियन सैन्याच्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले आणि दोन जखमी झाले. त्याचवेळी, ओडेसामध्येही शनिवारी रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. हे वाचा -  Ukraine War: बुचानंतर आता मारियुपोलजवळ सापडली 9000 मृतदेहांची सामूहिक कबर सगळीकडून विरोध झाल्यानंतरही रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष सुरूच आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. दुसरीकडे रशियाचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कारण अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले असून, त्याचा वाईट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात