नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेनसोबतचा तणाव संवादानं सोडवण्याचं आवाहन केलं. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे गुरुवारी रशियानं युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पुतिन यांना अमेरिकेसह अनेक देशांकडून तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनसंदर्भातील ताज्या घडामोडींची माहिती दिली. त्याचवेळी रशिया आणि नाटो गटांमधील मतभेद प्रामाणिक संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला. हिंसाचार ताबडतोब थांबवण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना राजनैतिक संवाद आणि संवादाच्या मार्गावर परतण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. रशिया-युक्रेन वॉर: युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा बळी, शेकडो जखमी गुरुवारी पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांच्या आणि विशेषतः युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. त्यांनी रशियाला सांगितलं की, या नागरिकांना मायदेशी परत आणणं हे भारताचे प्राधान्य आहे. PMO ने माहिती दिली की, दोन्ही नेत्यांनी मान्य केलं आहे की त्यांचे अधिकारी आणि मुत्सद्दी पथके या मुद्द्यांवर नियमित संपर्क ठेवतील. मोदी-पुतिन यांच्या चर्चेबाबत एका रशियन निवेदनात म्हटलं आहे की, चर्चेदरम्यान पुतिन यांनी डोनबासच्या नागरी लोकसंख्येविरुद्ध कीवच्या आक्रमक कृती तसेच मिन्स्क करार मोडण्याच्या उद्देशाने युक्रेनच्या विनाशकारी धोरण याचे मूलभूत मूल्यांकन अधोरेखित केलं. या परिस्थितीत, आणि युक्रेनच्या प्रदेशात अमेरिका आणि त्याच्या नाटो सहयोगी देशांच्या लष्करी घडामोडी पाहता रशियाला अस्वीकार्य, विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं निवेदनात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरणाबद्दल आभार मानले आणि सध्या युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी मदत मागितली, असं निवेदनात म्हटलं आहे. त्यात म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. निवेदनात म्हटलं आहे की, डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या रशिया-भारत शिखर परिषदेच्या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याच्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली. IND vs SL : चहल बनला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर, बुमराहसह सर्वांना टाकलं मागं भारत सर्व देशांच्या कायदेशीर सुरक्षेचे हित लक्षात घेऊन तणाव कमी करण्यासाठी दबाव आणत आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेननं भारताचा पाठिंबा मागितल्यानंतर काही तासांनंतर मोदी आणि पुतीन यांच्यातील फोनवर बोलणं झालं. पंतप्रधान मोदींच्या पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेपूर्वी युक्रेननं म्हटलं होतं की, भारताचे रशियाशी विशेष संबंध आहेत आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.