जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : चहल बनला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर, बुमराहसह सर्वांना टाकलं मागं

IND vs SL : चहल बनला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर, बुमराहसह सर्वांना टाकलं मागं

IND vs SL : चहल बनला टीम इंडियाचा नंबर 1 बॉलर, बुमराहसह सर्वांना टाकलं मागं

चहलला मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आगामी वर्ल्ड कपसाठी दावेदारी सादर केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील गुरूवारी झालेल्या टी20 मॅचमध्ये अनेक रेकॉर्डची नोंद झाली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅटर बनला. त्याने गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये विराट कोहली आणि मार्टीन गप्टील यांना मागे टाकले. तर भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी20 इंटरनॅशनलमधील सर्वात यशस्वी भारतीय बॉलर ठरला आहे. भारताने दिलेल्या 200 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 137 रनच करता आल्या. श्रीलंकेकडून चरिथा असलंकाने सर्वाधिक 53 रनची नाबाद खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. चहलनं एक विकेट घेताच त्याने या रेकॉर्डची नोंद केली. त्याने फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकलं. चहलच्या आता टी 20 इंटरनॅशनलमध्ये 67 विकेट्स झाल्या आहेत. त्याने 53 इनिंगमध्ये 25 च्या सरासरीनं या विकेट्स घेतल्या आहेत. 25 रन देत 6 विकेट्स ही चहलची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने एका इनिंगमध्ये 4 विकेट्स 2 वेळा तर 5 विकेट्स एकदा घेतल्या आहेत. बुमराहनं 55 इनिंगमध्ये 66 विकेट्स घेतल्यात. तर आर. अश्विन 61 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 वर्ल्ड कपमधून आऊट, माजी कोचचा दावा चहलला मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आगामी वर्ल्ड कपसाठी दावेदारी सादर केली आहे. चहलनं त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीमध्ये 222 इनिंगमध्ये 25 च्या सरासरीनं 246 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 7.48 आहे. तर त्याने वन-डे क्रिकेटमधील 60 इनिंगमध्ये 104 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात