मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा बळी, शेकडो जखमी

Russia-Ukraine War: युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा बळी, शेकडो जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या (Russia) हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) मोठा विध्वंस झाला आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Russia-Ukraine War: रशियाच्या (Russia) हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) मोठा विध्वंस झाला आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Russia-Ukraine War: रशियाच्या (Russia) हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) मोठा विध्वंस झाला आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    युक्रेन, 25 फेब्रुवारी: रशियाच्या (Russia) हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये (Ukraine) मोठा विध्वंस झाला आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याचंही समजतंय. AFP नं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेन्स्की (Ukraine's President Volodymyr Zelenskyy) यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. रशियाशी लढण्यासाठी युक्रेन एकाकी पडल्याचं राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. दरम्यान यात 10 जवानांचाही मृत्यू झाला आहे. तर 316 नागरिक जखमी झाले असल्याची माहिती जेलेन्स्की यांनी दिली आहे. गुरुवारी, युक्रेनचे आरोग्य मंत्री विक्टर ल्याश्को यांनी पुष्टी केली होती की, रशियन हल्ल्यात 57 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू आणि 169 जखमी झाले. रशियन सैन्यानं चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प घेतला ताब्यात रशियन सैन्यानं गुरुवारी उत्तर युक्रेनमधील पिपरियात शहराजवळील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाचा ताबा घेतला. रशियन संसदेनं ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, चेर्नोबिल रशियन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. चेर्नोबिल अणु प्रकल्पावर ताबा मिळवणं म्हणजे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे. बायडेन यांनी रशियावर लादले कठोर आर्थिक निर्बंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध निवडले. त्याने रशियाविरूद्ध कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले, मात्र रशियन सैन्याविरूद्ध युद्ध करण्यासाठी युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्यास स्पष्टपणे नकार दिला. पुढे त्यांनी म्हटलं की, रशियाच्या विरोधात जग एकवटलं आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या पहिल्या दिवशी काय घडलं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी माहिती दिली की, युक्रेनवरील हल्ल्याचा पहिला दिवस खूप यशस्वी झाला. काही तासांपूर्वी, रशियानं युक्रेनवरील 11 एअरड्रोमसह जमिनीवरील सुमारे 74 लष्करी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या. त्याचवेळी युक्रेनने सांगितलं की, हल्ल्याच्या पहिल्या दिवशी रशियानं 203 हल्ले केले. रशियन सैन्यानं गुरुवारी युक्रेनवर मोठा हल्ला केला. हवाई हल्ले आणि गोळीबारात तेथील शहरे आणि तळांना लक्ष्य केलं. रशियन हल्ल्याच्या परिणामी, लोक गाड्या आणि कारमधून क्षेत्र सोडण्याचा प्रयत्न करताना दिसले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या