जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Russia-Ukraine Crisis चा भारताला बसू शकतो मोठा फटका, या वस्तूंच्या व्यापारावर होणार परिणाम

Russia-Ukraine Crisis चा भारताला बसू शकतो मोठा फटका, या वस्तूंच्या व्यापारावर होणार परिणाम

Russia-Ukraine Crisis चा भारताला बसू शकतो मोठा फटका, या वस्तूंच्या व्यापारावर होणार परिणाम

दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या लष्करी तणावामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाचा धोका जाणवत आहे. हा युद्धाचा धोका केवळ पूर्व युरोपपुरता मर्यादित राहिलेला नाही. अमेरिका (US) आणि भारतासारख्या (India) इतर देशांनादेखील त्याची झळ बसण्यास सरुवात झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी: युरोपमध्ये (Europe Latest News Update) गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनच्या (Russia-Ukraine New Update) सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष युक्रेन-रशिया बॉर्डरकडे (Ukraine-Russia Border) आहे. रशियानं उचलेल्या पावलानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटोनं (NATO) पूर्व युरोपमधील हालचाली तीव्र केल्या आहेत. रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर हल्ला करू शकतो, असं अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांचं मत आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या लष्करी तणावामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाचा धोका जाणवत आहे. हा युद्धाचा धोका केवळ पूर्व युरोपपुरता मर्यादित राहिलेला नाही. अमेरिका (US) आणि भारतासारख्या (India) इतर देशांनादेखील त्याची झळ बसण्यास सरुवात झाली आहे. जगभरातील शेअर बाजारात सर्वांगीण विक्री (Share Market Latest News) सुरू आहे. या तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) आणि व्यापाराला बऱ्यापैकी फटका बसू शकतो. हे वाचा- 1.30 लाख सैनिक,रणगाडे, क्षेपणास्त्र; युक्रेनला तीन बाजूंनी घेरलं, रशिया उद्या करणार हल्ला? ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतानं युक्रेनकडून 1.45 अब्ज डॉलर्स किमतीचं खाद्यतेल (Edible Oil) खरेदी केलं आहे. याशिवाय भारतानं युक्रेनमधून सुमारे 210 दशलक्ष डॉलर्स किमतीची खतं (Fertilizers) आणि सुमारे 103 दशलक्ष डॉलर्स किमतीचे न्युक्लियर रिअॅक्टर्स (Nuclear Reactors) तसंच बॉयलर (Boiler) आयात केले आहेत. न्युक्लियर रिअॅक्टर्स आणि बॉयलरच्या बाबतीत युक्रेन हा रशियानंतर भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास भारताचं अणुऊर्जेसंबंधी (Nuclear Anergy) काम मंदावू शकतं. भारतातील युक्रेन दूतावासाच्या (Ukraine Embassy in India) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये (India Ukraine Bilateral Trade) 2.69 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. यापैकी युक्रेननं भारताला 1.97 बिलियन डॉलर्सची तर, भारताने युक्रेनला 721.54 दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे. युक्रेन भारताला खाद्यतेल (Fat&Oil of Veg Origin), खतं, न्युक्लियर रिअॅक्टर्स आणि बॉयलर यासारख्या आवश्यक यंत्रसामग्रीची निर्यात करतो तर भारताकडून औषधं आणि इलेक्ट्रिकल मशिनरी खरेदी करतो. हे वाचा- ‘‘मोठी किंमत मोजावी लागेल’’, अमेरिकेचा रशियाला इशारा आज तक ने दिलेल्य वृतानुसार, दिल्ली युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर आणि स्ट्रॅटेजिक अफेअर्सचे तज्ज्ञ डॉ. सुधीर सिंह (Dr. Sudhir Singh) म्हणतात की, युक्रेन-रशिया वादामुळे भारतासाठी राजकीय समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा तणाव वाढेल आणि व्यापक युद्धाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा भारतालासुद्धा आपली भूमिका घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत जर भारतानं अमेरिका किंवा रशिया यापैकी एकाची बाजू घेतल्यास दूरगामी परिणामांचा सामना करावा लागू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UN Security Council) झालेल्या मतदानात भारतानं घेतलेल्या भूमिकेतून हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. आर्थिकदृष्ट्याही भारतासमोर अनेक आव्हानं उभी राहू शकतात. कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. रशिया हा भारताच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे. युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्या आयात बिलात वाढ होऊ शकते. या सोबतच देशांतर्गत पातळीवरसुद्धा महागाई (Inflation in India) वाढण्याचा धोका आहे. याशिवाय, युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेत आहेत. युद्ध सुरू झाल्यास भारताला त्यांच्या सुरक्षेचीही व्यवस्था करावी लागेल. हे वाचा- Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल युक्रेन आणि भारत व्यापारी संबंधांमध्ये रशियाचा मोठा प्रभाव पडतो. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील व्यापाराचा कल पाहिला तर भारताच्या रशियाशी असलेल्या संबंधानुसार त्यात चढ-उतार होत आहेत. 2014 मध्ये, क्रिमियावरून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढण्यापूर्वी, भारत आणि युक्रेनमधील व्यापार 3 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होता. या तणावानंतर 2015 मध्ये, हा व्यापार 1.8 बिलियन डॉलर्सपर्यंत घसरला होता. नंतर, भारत-युक्रेन दरम्यानचा व्यापार काहीसा सुधारला परंतु, तरीही तो जुन्या पातळीवर पोहोचला नाही. सध्या तणाव वाढल्यानं युक्रेन-भारत व्यापारी संबंध पुन्हा संकटात आले आहेत. एकूण परिस्थिती पाहता युक्रेन-रशिया दरम्यानच्या वादाचं रुपांतर युद्धात न होणं, हेच भारत आणि इतर राष्ट्रांच्या फायद्याचं ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात