जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिका युक्रेनमधील दूतावास रिकामी करणार, आणखी 3000 सैनिक पाठवणार

Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिका युक्रेनमधील दूतावास रिकामी करणार, आणखी 3000 सैनिक पाठवणार

Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिका युक्रेनमधील दूतावास रिकामी करणार, आणखी 3000 सैनिक पाठवणार

युक्रेनवर रशियन आक्रमणाचा धोका वाढवत (Russia Ukraine Conflict) असताना युनायटेड स्टेट्स (America) युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा करण्याची तयारी करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: युक्रेनवर रशियन आक्रमणाचा धोका वाढवत (Russia Ukraine Conflict) असताना युनायटेड स्टेट्स (America) युक्रेनमधील आपला दूतावास रिकामा करण्याची तयारी करत आहे. यूएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परराष्ट्र विभाग लवकरच घोषणा करेल की कीव दूतावासातील सर्व अमेरिकन कर्मचाऱ्यांना रशियन आक्रमणाच्या भीतीमुळे देश अगोदरच सोडणं आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य केलं नाही. मंत्रालयानं यापूर्वी युक्रेनमधील (Ukraine) अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. याशिवाय अत्यावश्यक नसलेल्या कर्मचार्‍यांना तेथून जायचे की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या संभाव्य हल्ल्याबद्दल अमेरिकेने इशारे दिल्याच्या वेळी हे नवीन पाऊल पुढे आले आहे. ‘‘हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू’’, महिला नेत्याचं वादग्रस्त विधान   नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकार्‍यांनी सांगितले की, अमेरिकेची राजनैतिक उपस्थिती कायम ठेवण्यासाठी मर्यादित संख्येत अमेरिकन मुत्सद्दी नाटो सहयोगी पोलंडच्या सीमेजवळ युक्रेनच्या सुदूर पश्चिमेकडे हलवले जाऊ शकतात. अमेरिकेने पोलंडमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवले त्याचवेळी, पेंटागॉन पोलंडमध्ये आणखी 3,000 लष्करी सैन्य पाठवत आहे, जे उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सहयोगी देशांबद्दलची यूएस वचनबद्धता दर्शवते. पोलंडमध्ये आधीच 1,700 सैनिक तैनात आहेत. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, हे अतिरिक्त सैन्य पुढील काही दिवसांत उत्तर कॅरोलिनामधील फोर्ट ब्रॅग येथून निघून पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला पोलंडमध्ये पोहोचेल. या सैनिकांचे ध्येय प्रशिक्षण देणे आणि हल्ला थांबवणे हे असेल, मात्र ते युक्रेनमध्ये लढण्यात सहभागी होणार नाहीत. नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले या घोषणेच्या काही वेळापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवर कधीही हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात. नाटो सहयोगी देशांना वचनबद्ध म्हणून पोलंडमध्ये अमेरिकन सैन्याच्या तैनातीव्यतिरिक्त, जर्मनीमध्ये तैनात असलेल्या सुमारे 1,000 अमेरिकन सैन्याला रोमानियामध्ये पाठवले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: america , russia
  • First Published :
जाहिरात
जाहिरात