न्यूयॉर्क, 13 फेब्रुवारी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी शनिवारी पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांना युक्रेनच्या (Ukraine) सीमेवरुन एक लाखाहून अधिक सैनिकांचा जमाव हटवण्यास सांगितलं. तसंच रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका (United States) आणि त्याचे मित्र देश जोरदार प्रत्युत्तर देतील आणि त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही दिला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी पुतीन यांना सांगितलं की , या हल्ल्याचा परिणाम व्यापक मानवाला भोगावा लागेल आणि रशियाची प्रतिमा मलीन होईल. त्याचबरोबर, बायडेन यांनी पुतीन यांना असंही सांगितलं की, अमेरिका युक्रेनवर मुत्सद्दीगिरी सुरू ठेवेल. मात्र इतर परिस्थितींसाठी तितकेच तयार आहे.
युक्रेनच्या संकटादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात 62 मिनिटे फोनवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जेव्हा बातचीत ज्यावेळी बायडेन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने गुप्तचर माहितीचा हवाला देऊन रशिया काही दिवसांत आणि बीजिंगमध्ये चालू असलेल्या शीत ऑलिम्पिक 20 फेब्रुवारीला संपण्यापूर्वी हल्ला करू शकतो.
President Joe Biden spoke with Russian Pres Vladimir Putin over military buildup on Ukraine borders. Biden reiterated that further Russian invasion of Ukraine would produce widespread human suffering & diminish Russia’s standing. US together with allies will respond decisively. pic.twitter.com/rgm8F4Gct7
— ANI (@ANI) February 12, 2022
विशेष म्हणजे रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैनिक जमवले असून शेजारील बेलारूसमध्ये सरावासाठी आपले सैन्य पाठवलं आहे. मात्र आपण युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा रशियानं सातत्याने नकार केला आहे. संकट आणखी वाढवत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पोलंडमध्ये 3000 अतिरिक्त अमेरिकन सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
काळ्या समुद्रातील बंदरात अमेरिका सैन्य तैनात
बायडेन यांनी म्हटले आहे की, अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये युद्ध करणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय मित्रांसह रशियाविरोधात कठोर आर्थिक निर्बंध आणण्याचे आश्वासन दिले आहे. यूएस अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, स्टेट डिपार्टमेंट शनिवारी युक्रेनची राजधानी कीव येथील दूतावासातून सर्व अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा करू शकते. मात्र या संदर्भात परराष्ट्र खात्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचंआवाहन केलं आहे. रशियन हल्ल्यानंतर हवाई सेवा किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यास अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन सैन्यानं त्यांना बाहेर काढण्याची अपेक्षा करू नये, असंही त्यांनी जोर देऊन म्हटलं आहे.
मोठी दुर्घटना: भुयारी बोगदा कोसळला, 9 मजूर अडकले; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
अमेरिका रोमानियाच्या कॉन्स्टँटा येथील काळ्या समुद्रातील बंदरावर जड लष्करी साहित्य तैनात करत आहे. याचाच अर्थ अमेरिका तेथे आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे आणि आणखी 1,000 सैन्य तेथे एअरबेसवर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, President Vladimir Putin, Russia