मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia-Ukraine War: खार्किवमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियानं घेतला मोठा निर्णय

Russia-Ukraine War: खार्किवमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियानं घेतला मोठा निर्णय

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशिया यांच्यातील (Russia-Ukraine War) युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशिया यांच्यातील (Russia-Ukraine War) युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

Russia-Ukraine War: युक्रेन आणि रशिया यांच्यातील (Russia-Ukraine War) युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

कीव, 03 मार्च: युक्रेन आणि रशिया यांच्यातील (Russia-Ukraine War) युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान भारत सरकारनं (Russia-Ukraine War Indian Nationals Evacuation) रशियासोबत एक महत्त्वाचा करार केला आहे.

खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियानं 6 तास युद्ध थांबवण्याचं मान्य केलं आहे. तेथे अडकलेल्या भारतीय लोकांना खार्किवपासून युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हे अंतर निश्चित करण्यात आलं आहे.

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था, ट्रेनच्या सीटसाठी विकला Ipad

युक्रेनच्या खार्किव शहरात अजूनही हजारो विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे. भारतीयांना बाहेर पडू दिलं जात नसल्याचं सांगण्यात आलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना सांगितलं की, रशिया सर्वतोपरी शक्य मदत करण्यास तयार आहे. खार्किवमध्ये युक्रेनचे सैन्य भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे.

पुतिन यांनी दिलं होतं मदतीचं आश्वासन

भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना भारतात पाठवण्यासाठी सर्व आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, असं पीएम मोदींसोबतच्या संभाषणादरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी आश्वासन दिलं होतं. रशियन सैन्य या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारतीय विद्यार्थ्यांच्या तात्काळ सुटकेसाठी रशियन लष्कराकडून खार्किव ते रशियापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याबाबतही त्यांनी बोललं. दुसऱ्याच दिवशी रशियानं 6 तास युद्ध थांबवण्याचं मान्य केलं आहे.

भारतीय दूतावासानं बुधवारी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून लवकरात लवकर खार्किव सोडण्यास सांगितलं. दूतावासानं सल्लागारात म्हटलं आहे की, भारतीय नागरिक खार्किव सोडले आणि पेसोचिन, बाबे आणि बेझल्युडोव्हका येथे पोहोचले, जे सुमारे 16 किमीचं अंतर आहे.

मोठी बातमी: भरधाव स्कोडा कारनं चार Swiggy Boys ना चिरडलं

दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत, बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रज्जो येथून 3 फ्लाइटने 3,726 भारतीयांना आज भारतात परत आणले जाईल.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin, Russia Ukraine, Vladimir putin