मराठी बातम्या /बातम्या /देश /

वेगवान स्कोडा कारनं चार Swiggy डिलिव्हरी Boys ना चिरडलं, चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू

वेगवान स्कोडा कारनं चार Swiggy डिलिव्हरी Boys ना चिरडलं, चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या स्कोडा कारच्या  (Skoda Car) चालकानं दोन बाईकवरील स्विगी कंपनीच्या चार डिलिव्हरी बॉयला चिरडलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 03 मार्च: दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पुन्हा एकदा अतिवेगानं गाडी (Accident in Gurugram) चालवण्याचा कहर पाहायला मिळाला आहे. शहरातील गोल्फ कोर्स रोडवर भरधाव वेगात आलेल्या स्कोडा कारच्या (Skoda Car) चालकानं दोन बाईकवरील स्विगी कंपनीच्या चार डिलिव्हरी बॉयला चिरडलं आहे.

या चार तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Swiggy Deliver Boys Death)आहे. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपीची कारही ताब्यात घेतली आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काल रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

या चारही तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी याच अपघातात एक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच डीएलएफ फेज वन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने चालकाला ताब्यात घेऊन कार ताब्यात घेतली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. गुरुग्राम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम केलं आहे.

First published:

Tags: Accident, Delhi