मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था, एका ट्रेनच्या सीटसाठी 15 हजारात विकावा लागला Ipad

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था, एका ट्रेनच्या सीटसाठी 15 हजारात विकावा लागला Ipad

Russia-Ukraine War: ट्रेनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयपॅड (iPad) विकावा लागला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Russia-Ukraine War: ट्रेनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयपॅड (iPad) विकावा लागला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Russia-Ukraine War: ट्रेनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयपॅड (iPad) विकावा लागला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
खार्किव, 03 मार्च: रशियाच्या (Russia)आक्रमणानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, विद्यार्थ्यांना (Indian Citizens Stranded in Ukraine) सुरक्षित बाहेर काढण्यापासून ते जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. त्यातच अशी वेगळी घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयपॅड (iPad) विकावा लागला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय परदेशातील आव्हानांचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, ट्रेनमधील ठिकाणापासून ते इतर अनेक ठिकाणी युक्रेनियन लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना, केरळमधील 19 वर्षीय ग्रीन राज वोक्जल मेट्रो स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता. मेट्रोच्या आतही परिस्थिती नेहमीसारखी सुरक्षित नाही आहे. ग्रीन राजनं सांगितलं, मंगळवारी मेट्रोसमोर बॉम्बस्फोट झाला. आम्ही खाली असल्यानं आम्हाला ते जाणवले. एका महिलेला तिचा पाय गमवावा लागला आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. तिथे खूप रक्त सांडलं होतं. भारतीय मेडिकल विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. नंतर तासाभर चालल्यानंतर वोक्जलला पोहोचलो. Chelsea for Sale: पुतीनच्या यांच्या जवळचे अब्जाधीश करणार चेल्सी क्लबची विक्री, युद्धपीडितांना देणार मदत काल माझ्या एका सीनिअरनं त्याचा आयपॅड विकला आणि ट्रेनमध्ये एका सीटसाठी 6000 UAH (सुमारे 15,000 रुपये) दिले, असं सांगितलं. त्यांनी माहिती दिली, सुरुवातीला आमच्या एजंटांनी आम्हाला मेट्रो स्टेशन किंवा बंकरमध्ये कव्हर घेण्यास सांगितलं. आम्हाला बंकर सापडला नाही, म्हणून आम्ही कागदपत्रांसह जवळच्या मेट्रो स्टेशनकडे धाव घेतली. हा माझा 7 वा दिवस आहे आणि आम्ही अजूनही दूतावास रशिया मार्गे रिकामे होण्याची वाट पाहत आहोत, कारण ते खार्किवपासून जवळ 42 किमीवर आहे. सुरक्षित बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचण्यासाठी खार्किव रेल्वे स्थानकावर थांबले आहेत. दरम्यान, परिस्थिती इतकी गंभीर आहे की केवळ स्थानकापर्यंत पोहोचणं ही सुरक्षिततेची हमी नाही. केरळचा रहिवासी असलेला 22 वर्षीय जोल जॉपसन सकाळी स्टेशनवर पोहोचला तेव्हा दोन दिवसांपूर्वी बंकरमधून बाहेर पडलेले वरिष्ठही वाट पाहत होते. जॉपसन म्हणाला की, भारतीय विद्यार्थ्यांसाठी बाहेर पडण्याची प्रक्रिया संथ आहे, कारण युक्रेनियन नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे. Virat Kohli 100th Test : विराटच्या जुन्या मित्रांनी सांगितले WhatsApp Group मधील खास किस्से  खार्किवमधील मेडिकल विद्यार्थिनी जयलक्ष्मी म्हणाली की, तिच्या वसतिगृहाजवळ सतत गोळीबार होत होता आणि ती आणि इतर भारतीय विद्यार्थी सुमारे एक आठवडा बंकरमध्ये राहिल्यानंतर स्टेशनवर पोहोचले. ती म्हणाली, मात्र स्टेशनवर पोहोचलो तेव्हा खूप गर्दी होती. आम्हाला ट्रेन पकडता आली नाही. युद्धग्रस्त भागात अडकलेले विद्यार्थी सल्लागार आणि टीम SOS इंडियाकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच स्टेशनकडे रवाना होत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पोलंडच्या सीमेजवळील लिव्हमध्ये भारतीय दूतावासाचे कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली आहे. राजस्थानमधील अर्शी शेख सांगते की, भारतीय पुरुष विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये स्थान मिळणं खूप कठीण आहे. अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी मेट्रो स्टेशनवरच आसरा घेतला आहे.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या