PPE सूटच्या आत फक्त इनर घालून ही नर्स करतेय कोरोना रुग्णांवर उपचार, PHOTO VIRAL

PPE सूटच्या आत फक्त इनर घालून ही नर्स करतेय कोरोना रुग्णांवर उपचार, PHOTO VIRAL

सोशल मीडियावर फोटो Viral झाल्यानंतर 23 वर्षांच्या नादिया नर्सनं ट्रोलर्सला काय उत्तर दिलं वाचा.

  • Share this:

मॉस्को, 30 मे : रूसमधील एका रुग्णालयात नर्सनं इनर वेअरवर PPE कीट घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाव्हायरसच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल आहे. तिला रशियाची 'टू हॉट नर्स' म्हणूनही ओळखलं जात आहे. रशियातील नर्स आणि तिच्या सहकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोल करणाऱ्यांना नर्सनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

रुग्णांवर सतत उपचार करण्यासाठी त्यांना कायम PPE सूट कायम घालावा लागतो. त्यामुळे खूप गरम होतं बऱ्याचदा सलग रुग्णांना तपासावं लागत असल्यानं ब्रेकही मिळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं त्या PPE सूट घातल असल्याचं सांगितल्यानंतरही अनेक युझर्सनी त्यांची खिल्ली उडवणं आणि थांबवलं नाही.

हे वाचा-जगातभारी VIDEO! 103 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवताच उघडली बिअरची बॉटल

नर्सनं ट्रोलर्सना दिलं चोख प्रत्युत्तर...

सतत पीपीई कीट घालून राहावं लागत असल्यानं उष्णतेमुळे असह्य होतं. त्यामुळे या नर्स आपला गाऊन काढून फक्त आतल्या कपड्यांवर पीपीई सूट चढवतात. याशिवाय अनेकदा सलग तीन तीन शिफ्टमध्ये काम करण्याची वेळही येते. मी माझे काम करीत होते आणि उष्णतेमुळे मला ते थांबवायचे नव्हते. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून रूग्णांची काळजी घेतो त्यांच्यावर उपचार करत असतो, जे लोक माझे कपडे पाहून मला ट्रोल करत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, असं 23 वर्षांच्या नादिया नावाच्या तरुणीचं म्हणणं आहे.

नादियाच्या दृष्टीनं रूग्णांची काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे. नादियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयानं तिच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टर-परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांनी नादियाच्या बाजूनं उभं राहण्यासाठी मोर्चा काढला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मते नादियाचं म्हणणं समजून घेण्याऐवजी ट्रोलर्सच्या मतावरून रुग्णालयानं कारवाई करणं चुकीचं आहे.

हे वाचा-हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र

हे वाचा-कोरोना वॅक्सीनची ट्रायल केलेल्या तरुणाचे झालेत असे हाल, वाचून बसेल मोठा धक्का

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 3:58 PM IST

ताज्या बातम्या