मॅसेच्युसेट्स, 30 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. 3 लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधितांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अमेरिकेत सर्वात जास्त रुग्ण आहेत. दुसरीकडे आनंदाची बाब म्हणजे 2.4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. मात्र जेव्हा 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला वृद्ध कोरोनावर मात करतात, तेव्हा एक वेगळीच उर्जा येते. अशाच अमेरिकेतील एका 104 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथे राहणाऱ्या या आजींनी कोरोनावर मात केली खरी, मात्र त्यापेक्षा त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त व्हायरल होत आहे. या आजींनी आपण कोरोनाला हरवल्याचं कळतं बिअर मागवल, आणि बिअर पित शानदार सेलिब्रेशन केलं. वाचा- मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO
वाचा- तिसऱ्या मजल्यावरून लटकत होता 3 वर्षांचा चिमुरडा, तेवढ्यात आला डिलिव्हरी बॉय युएसए टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, जेनी स्टीजना अशा या आजींचं नाव असून, त्या तीन आठवडे कोरोनाशी लढत होत्या. नर्सिंग होममध्ये असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्या बरे होऊ शकणार नाही, असं वाटत असताना डॉक्टरांनी त्या निरोगी झाल्या असल्याचं सांगितलं. जेनी यांच्या कुटुंबियांनी त्यांना फायटर असं नाव ठेवलं आहे. कारण जेव्हा त्यांना कोणी मस्करीत विचारायचं की जगायचं आहे की स्वर्गात जायचं आहे, तेव्हा त्या मोठ्या आनंदात मला मला जगायचं आहे, असं सांगायच्या. जेनी निरोगी झाल्यानंतर नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आनंद साजरा करण्यासाठी कोल्ड बिअर दिली, जी त्यांना आवडते. वाचा- दोन छोट्या भावंडांचे VIDEO झाले धम्माल हिट; ऑस्ट्रेलियातून गातायत मराठी गाणी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातील लोकांनी या आजींचे कौतुक केलं आहे. तसंच त्यांचा उत्साह हा तरुणांनाही लाजवणारा आहे, असंही म्हटलं आहे.