कोरोना वॅक्सीनची ट्रायल केलेल्या तरुणाचे झालेत असे हाल, वाचून बसेल मोठा धक्का

कोरोना वॅक्सीनची ट्रायल केलेल्या तरुणाचे झालेत असे हाल, वाचून बसेल मोठा धक्का

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर जवळपास 12 तास त्यांना 103 ताप आला होता.

  • Share this:

वॉश्गिंटन 30 मे : जगभरात कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये लसीबाबत ट्रायल सुरू आहे. लसीची प्रायोगिक चाचणी झालेल्या एका रुग्णाची तब्येत मात्र अचानक बिघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लसीचा वाईट परिणाम त्याच्या शरीरावर झाला आहे.

अमेरिकेती एका मॉडर्ना कंपनीनं ही लस तयार केली आणि या लसीची सध्या चाचणी सुरू आहे. वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय तरुण इयान हेडन याच्यावर कोरोनाच्या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळासाठी इआन बेशुद्ध झाल्याचंही त्यांनी माहिती दिली.

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर जवळपास 12 तास त्यांना 103 ताप आला होता. कोरोनाच्या या लसीचा प्रयोग त्यांच्यावर वाईट परिणाम करत असला तरीही लवकरात लवकर ही लस उपलब्ध व्हावी असं त्यांच म्हणणं आहे. त्यासाठी इयान लागेल ती मदत करण्यासाठी तयारही आहेत.

हे वाचा-देशाला लवकरच मिळणार कोरोनावर लस, पण शास्त्रज्ञांना सतावत आहे वेगळीच चिंता

इयानची अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आलं. उपचारानंतर घरी परतताच पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर 24 तासाच्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली. मॉडर्ना कंपनीने तयार केलेल्या लसीला लोक विरोध करणार नाहीत. पण माझी अशी अवस्था पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण होण्याची शक्यता आहे असंही इआन म्हणाला.

हे वाचा-चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...

Reuters/Ipsos यांनी केलेल्या एका सर्व्हेनुसार अमेरिकेतील अनेक तरुण वॅक्सीन घेण्यासाठी घाबरत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना वॅक्सीनचा प्रयोग जास्त भीतीदायक वाटतो असं समोर आलं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूंपासून समुदायामध्ये प्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी किमान 70 टक्के लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, इयान हेडनने सांगितले की जेव्हा त्यांना मॉडर्ना लसचा पहिला डोस देण्यात आला तेव्हा त्यांच्या हाताला काही वेदना झाली आणि हात वर करण्यासही त्याला खूप त्रास होऊ लागला.

मॉडर्ना कंपनीने इयानसह इतर 45 स्वयंसेवकांना कोरोना लस दिली आहे. डेली मेलच्या अहवालानुसार आतापर्यंत चार स्वयंसेवकांना गंभीर समस्या आल्या आहेत पण कोणालाही अद्याप जीवघेणा धोका झाला असल्याचं आढळून आलं नाही.

हे वाचा-कोरोना व्हायरसवर 5  महिन्यात येणार औषध, या अमेरिकन कंपनीचा दावा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या