Home /News /videsh /

युक्रेनपाठोपाठ हे दोन देश रशियाच्या निशाण्यावर; सीमेवर पाठवली घातक आण्विक क्षेपणास्त्रे, युद्ध होणार?

युक्रेनपाठोपाठ हे दोन देश रशियाच्या निशाण्यावर; सीमेवर पाठवली घातक आण्विक क्षेपणास्त्रे, युद्ध होणार?

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दोन्ही देशांना पाश्चिमात्य लष्करी आघाडी नाटोमध्ये सामील होणं ही त्यांची मोठी चूक ठरेल, असा इशारा दिला होता. मात्र दोन्ही देशांनी या इशाऱ्याकडे कानाडोळा करत नाटो देशांच्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 17 मे : नाटो देशांच्या आघाडीत सहभागी होण्याची घोषणा करणाऱ्या फिनलँड आणि स्वीडनला (Finland and Sweden) धडा शिकवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार या दोन्ही देशांच्या सीमेवर धोकादायक आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याचं काम सुरू झालं आहे. रस्त्यांवर आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेली इस्कंदर क्षेपणास्त्रे (Iskander Missiles) फिनिश सीमेकडे वाहून नेताना दिसली आहेत. नाटोचा विस्तार रोखण्यासाठी रशिया कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं मानलं जात आहे. सध्या याचं उदाहरण युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे (Russia Ukraine War) रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दोन्ही देशांना पाश्चिमात्य लष्करी आघाडी नाटोमध्ये सामील होणं ही त्यांची मोठी चूक ठरेल, असा इशारा दिला होता. मात्र दोन्ही देशांनी या इशाऱ्याकडे कानाडोळा करत आपलं पारंपारिक तटस्थतेचं धोरण सोडून नाटो देशांच्या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष आता अधिक धोकादायक रूप धारण करताना दिसत आहेत. फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगण्यास तयार राहावं, असं मॉस्कोनं स्पष्ट केलं आहे. रशियाला युक्रेनच्या रणगाड्यापेक्षा छोटूश्या कुत्र्याची भीती? 200 हून अधिक स्फोटकं केली निकामी 'द सन'च्या वृत्तानुसार, रशियाचा घातक अणुबॉम्ब घेऊन जाणारा इस्कंदर क्षेपणास्त्रांचा ताफा वायबोर्गच्या दिशेने जात असल्याचं दिसून आलं. फिन्निश सीमेपासून अवघ्या 24 किमी अंतरावर असलेले हे रशियामधील शेवटचे शहर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिनलँड आणि स्वीडनला धडा शिकवण्यासाठी रशिया लवकरच या देशांसाठी नवीन लष्करी तुकडी तयार करणार आहे. यासाठी इस्कंदर क्षेपणास्त्रांचा संपूर्ण विभाग वायबोर्गला पाठवला जात आहे. ही क्षेपणास्त्रे कमी पल्ल्याच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी आणि नाटो सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. या वर्षी 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युक्रेनविरुद्धच्या विशेष लष्करी कारवाईत ते रशियाचे प्रमुख शस्त्र होते. या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी किंवा पारंपारिक स्फोटके वाहून नेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ३१० किमी आहे. इस्कंदर क्षेपणास्त्रे बंकर-बस्टिंग आणि रडारविरोधी मोहिमांसाठी देखील तैनात केली जाऊ शकतात. पुतिन यांनी नाटो देशांना इशारा दिला आहे की, त्यांनी युक्रेन संघर्षात ढवळाढवळ केली, तर विजेच्या वेगाने प्रत्युत्तर दिले जाईल. रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई रायबकोव्ह म्हणाले की, दोन स्कॅन्डिनेव्हियन देशांनी (फिनलँड आणि स्वीडन) त्यांच्या कृत्यांवर आम्ही शांत बसू असा कोणताही भ्रम ठेवू नये. युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध; पोलंडमधील संतप्त लोकांनी रशियन राजदूतावर फेकला लाल रंग रशियाची वृत्तवाहिनी रोसिया वनचे समालोचक म्हणाले, 'त्यांचं अधिकृत कारण भीती आहे. पण नाटोमध्ये सामील झाल्यानंतर ते अधिक घाबरतील. जेव्हा स्वीडन आणि फिनलँडमध्ये नाटोचे तळ दिसू लागतील, तेव्हा हा असंतुलन आणि नवीन धोका संपवण्यासाठी अण्वस्त्रे तैनात करण्याशिवाय रशियाला पर्याय राहणार नाही. स्वीडननेही फिनलँडप्रमाणे लवकरच नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. नाटोमध्ये सामील होण्याच्या प्रयत्नाला सत्ताधारी सोशल डेमोक्रॅट्सनेही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, 14 नाटो देशांच्या 15,000 सैनिकांनी बाल्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी सराव सुरू केला आहे. 'सिल' नावाचा हा सराव रशियन तळापासून केवळ 40 मैलांवर होणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या