वारसा, 10 मे : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. यातच आता आणखी एक वेगळी बातमी समोर आली आहे. यावेळी वारसा येथील स्मशानभूमीत पोलंडमधील आंदोलकांनी त्यांच्यावर लाल रंग फेकला. आंद्रीव स्मशानभूमीत तत्कालीन सोवियत संघाच्या सैनिकांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आले होते. याठिकाणी युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या युद्धाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांचा एक समूह त्यांची वाट पाहत होता. नेमके काय घडले - या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, आंद्रीव यांच्या मागून लाल रंग टाकला जात आहे. तर एकाने त्यांच्या चेहऱ्यावर रंग टाकला आहे. यूक्रेनचा झेंडा हातात घेतलेल्या आंदोलकांनी आंद्रीव आणि रशियाच्या प्रतिनिधी मंडळाच्या इतर सदस्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासापासून रोखले. यावेळी युक्रेनविरोधात रशियाने केलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धाची झळ पोहोचलेल्या लोकांच्या प्रती संवेदना दाखवत आंदोलक एकत्र आले. यावेळी त्यांनी आंद्रीव यांच्यासमोर घोषणाही दिल्या. तर आंद्रीव यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांवरही लाल रंग फेकण्यात आला. हेही वाचा - Russia-Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना त्यांचा टी-शर्ट का विकावा लागला?, ‘इतकी’ मिळाली किंमत
तर याठिकाणी एकच गोंधळ झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानतंर स्मशानभूमीतून रशियाचे राजदूत आंद्रीव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना येथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांना तेथे बोलवण्यात आले. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला युरोपीय देशांची सरकारे, व्यक्ती आणि संघटना सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत.
युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी रशियावर बहिष्कार टाकला आणि त्यावर कडक आर्थिक निर्बंध लादले, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून महागाई शिगेला पोहोचली आहे. रशियातील अनेक नागरिक आणि संघटनाही या मुद्द्यांवरून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईला विरोध करत आहेत.