Home /News /videsh /

रशियाला युक्रेनच्या रणगाड्यापेक्षा छोटूश्या कुत्र्याची भीती? 200 हून अधिक स्फोटकं केली निकामी

रशियाला युक्रेनच्या रणगाड्यापेक्षा छोटूश्या कुत्र्याची भीती? 200 हून अधिक स्फोटकं केली निकामी

Ukraine War : झेलेन्स्की (Zelensky) म्हणाले, "आज मी युक्रेनच्या सर्व वीरांना आदर देऊ इच्छितो जे आपल्या जमिनीतून भूसुरुंग नष्ट करत आहेत. आणि आमच्या नायकांसोबत एक गोंडस लहान सैनिक पॅट्रॉन आहे.

    कीव, 10 मे : बलाढ्य रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी नागरिकांना शस्त्र हातात घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर अनेकजण आपला जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण करत आहेत. अशाच युद्धनायकांचा सन्मान राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. यात एका छोट्या हिरोने संपूर्ण जगाचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या प्रसिद्ध लँडमाइन स्निफिंग डॉग पॅट्रॉन (Patron) आणि त्याच्या मालकाला एक पदक प्रदान केलं. रॉयटर्सच्या मते, हे पदक रशियन आक्रमणानंतर पॅट्रॉन आणि त्याच्या मालकाच्या अतुलनीय सेवेचा सन्मान करण्यासाठी आहे. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून एका लहान जॅक रसेल टेरियर (Jack Russell terrier) जातीच्या श्वानाने 200 स्फोटके शोधून काढत त्यांना स्फोट होण्यापासून रोखले आहे. हा श्वान आता युक्रेनियन देशभक्तीचं प्रतीक झालाय. झेलेन्स्की यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत पत्रकार परिषदेत हा पुरस्कार दिला. यावेळी पॅट्रॉनने भुंकत शेपूट हलवली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हास्य आणि टाळ्यांचा आवाज घुमला. झेलेन्स्की यांनी समारंभानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आज मी युक्रेनच्या सर्व वीरांना आदर देऊ इच्छितो, जे आपल्या जमिनीतून भूसुरुंग काढत आहेत. आमच्या नायकांसोबत एक गोंडस छोटा सैनिक पॅट्रॉन आहे. त्याने केवळ बॉम्ब निकामी करण्यात मदत केली नाही, तर आमच्या मुलांना लँडमाइन प्रवण भागात सुरक्षिततेचे नियम शिकवले." हे पदक पॅट्रॉनचे मालक मिहाइलो इलिव्ह (Myhailo Iliev) यांना देण्यात आले. जे नागरी संरक्षण सेवेत मेजर आहे. युक्रेन युद्धात (Ukraine War) शौर्याच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. पण केवळ मानवच नाही तर प्राणीही पुढे येणाऱ्या रशियन सैनिकांपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यात आपली भूमिका बजावत आहेत. यापैकी एक आहे 2 वर्षांचा "पॅट्रॉन" (Patron). हा जॅक रसेल टेरियर जातीचा कुत्रा देखील त्यापैकीच एक आहे. युक्रेनमध्ये धोकादायक बॉम्ब शोधण्यासाठी पॅट्रॉन नायक बनला आहे. युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने फेसबुकवर पॅट्रॉनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की आत्तापर्यंत अनेक बॉम्ब शोधून काढले गेले आहेत आणि पॅट्रोनच्या मदतीने ते साफ केले गेले आहेत. रसेल टेरियर ही कुत्र्याची एक जात आहे जी 200 वर्षांपूर्वी कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी पैदास केली गेली होती. याला पार्सन रसेल टेरियर देखील म्हटले जाते, ही एक स्वतंत्र, चैतन्यशील आणि बुद्धिमान प्रजाती आहे जी प्रशिक्षित करणे आणि व्यवस्थापित करणे सोपे आहे. या लहान पिल्लाची उर्जा आणि कामामुळे ते युक्रेनच्या संरक्षण दलात लोकप्रिय झाले आहे. अल्पावधीतच पॅट्रॉन सोशल मीडियावरही लोकप्रिय झाला आहे. फेसबुकवर एका युजरने लिहिले, "हा श्वान नाही जादू आहे, कृपया स्वतःची आणि त्याची काळजी घ्या. युक्रेनला सलाम! आमच्या वीरांना सलाम! पॅट्रॉन देखील त्यापैकी एक आहे."
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या