Home /News /videsh /

Imran Khanची पत्नी बुशरा बीबी जाळतेय जिवंत कोंबडे, आता काय भूत आणि काळी जादू सरकार वाचवणार?

Imran Khanची पत्नी बुशरा बीबी जाळतेय जिवंत कोंबडे, आता काय भूत आणि काळी जादू सरकार वाचवणार?

Pakistan Power Tussle: इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशराविषयी एका टीव्ही चॅनलनं दावा केला होता की, तिचा चेहरा आरशात दिसत नाही. ती जिन्नांना मांस खायला घालते, असंही सांगण्यात आलं. बुशरा बीबीच्या रहस्यमय आयुष्याबाबत अनेक दंतकथा आहेत.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 29 मार्च : हा आठवडा पाकिस्तानच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान इम्रान खान  (Pakistan PM Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च रोजी चर्चा होणार आहे. त्यानंतर मतदान होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विरोधकांना 210 हून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमताचा आकडा 172 आहे. अशा स्थितीत इम्रान खान सहाजिकच तणावात आहेत आणि ते पत्नी बुशरा बीबीची मदत घेत आहेत. विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ (Leader of the Opposition Shahbaz Sharif) यांच्या सांगण्यानुसार इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी (bushara bibi) संकट टळण्यासाठी काळी जादू करत आहे. ती घरात जिवंत कोंबडे जाळत आहे. पाकिस्तानमध्ये अशीही चर्चा आहे की, बुशराला दोन जिन्न (मानवाच्या मृत्यूनंतर भटकणारे आत्मे) वश आहेत, ज्यांच्या बळावर ती सरकार वाचवू शकते. खरं तर, 372 सदस्यीय पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआयचे 155 सदस्य आहेत. इम्रान खान यांना बहुमतासाठी 172 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांचे अनेक आमदार बंडखोर झाले आहेत. युतीचे तीन प्रमुख पक्षही फुटले आहेत. अशा परिस्थितीत अविश्वास ठराव फेटाळण्याची शक्यता कमी आहे. हा ठराव मंजूर झाल्यास जवळपास चार वर्षं चाललेलं हे सरकार कोसळेल. हे वाचा - इम्रान खान यांचा निरोप निश्चित, फक्त प्रतीक्षा बाकी! 'हे' असतील पुढचे PM पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरात अनेक टन मांस जाळलं जात असल्याचा दावाही शाहबाज शरीफ यांनी केला आहे. निवृत्त क्रिकेटपटू पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी लग्न केल्यापासून बुशरा बीबी चर्चेत आहे. त्यांच्यावर यापूर्वीही काळी जादू केल्याचा आरोप आहे. इम्रान पंतप्रधान होऊ शकतील, असं स्वप्न बुशरा यांना पडलं होतं बुशराचे अनेक किस्से आहेत. पाकिस्तानात असं म्हटलं जातं की, बुशराला स्वप्न पडलं होतं की, जर इम्रान खाननं तिच्या घरातील मुलीशी लग्न केलं तर ते पंतप्रधान होऊ शकतात. या स्वप्नानंतर बुशरानं इम्रान यांच्यासोबत तिच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अपयशी ठरल्यानंतर तिनं स्वतःच तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन इम्रानशी लग्न करण्याची तयारी केली. इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा 2019 मध्ये प्रकाशझोतात आली होती. जेव्हा एका टीव्ही चॅनलनं दावा केला होता की, तिचा चेहरा आरशात दिसत नाही. ती जिन्नांना मांस खायला घालते, असंही सांगण्यात आलं. नंतर पाकिस्तानी मीडियानं याला फेक न्यूज म्हटलं होतं. असं असूनही, बुशरा बीबीच्या रहस्यमय आयुष्याबाबत अनेक दंतकथा आहेत. हे वाचा -आधी मौलवींनी काढलं अन् आता मंदिरातही रोखलं; मुस्लीम भरतनाट्यम नृत्यांगणेची व्यथा निकाह 18 फेब्रुवारी 2018 रोजी झाला इम्रान खान यांनी 18 फेब्रुवारी 2018 रोजी बुशरासोबत लग्न केलं होतं. 43 वर्षीय बुशरा इम्रानपेक्षा 25 वर्षांनी लहान असून तिला पहिल्या लग्नापासून पाच मुलं आहेत. बुशरा ही इम्रानची तिसरी पत्नी आहे. इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नीचं नाव जेमिमा गोल्डस्मिथ होतं, ती ब्रिटिश होती. दुसऱ्या पत्नीचं नाव रेहम खान होतं. रेहमकडेही ब्रिटिश नागरिकत्व आहे. इम्रान खान यांनी अल्पावधीतच दोन्ही पत्नींपासून घटस्फोट घेतला.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या