Home /News /national /

आधी मौलवींनी बाहेर काढलं अन् आता मंदिरातही रोखलं; मुस्लीम भरतनाट्यम नृत्यांगणेची व्यथा

आधी मौलवींनी बाहेर काढलं अन् आता मंदिरातही रोखलं; मुस्लीम भरतनाट्यम नृत्यांगणेची व्यथा

मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक असहिष्णू होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

    नवी दिल्ली, 29 मार्च : भारत धर्मनिरपेक्ष (Secular) देश आहे. आपल्या संस्कृतीतील सहिष्णुता (tolerance culture) आपली खास ओळख आहे. जगात यासाठी आपण ओळखले जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून लोक असहिष्णू होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. केरळमध्ये एका मुस्लीम मुलीने भरतनाट्यममध्ये प्रावीण्य मिळवले आणि आता ती त्यात पीएचडी करत आहे. अनेक मंचांवर त्याची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. पण धर्मांधांना हे आवडत नाही. आधी इस्लामिक मुल्लांनी तिला बहिष्कृत केलं होतं आणि आता मंदिरातदेखील तिचं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे. ही घटना केरळमधील (Kerala) त्रिसूर (Thrissur) जिल्ह्यातील आहे. येथे भरतनाट्यम नृत्यांगना मानसिया वी पीला इरिनजालाकुडा (Irinjalakuda) मंदिरमध्ये सादर करण्यास रोखलं आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना त्यांच्यासोबत घडल्या आहेत. गैर हिंदूंसाठी मंचावर जागा नाही... यापूर्वी भरतनाट्यममध्ये पीएचडी रिसर्च स्कॉलर मानसियाला मुस्लीम कुटुंबात जन्म घेऊन शास्त्रीय नृत्य प्रदर्शन केल्यामुळे इस्लामिक मौलवींचा आक्रोश आणि बहिष्काराचा सामना करावा लागला होता. मानसियाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, 21 एप्रिल रोजी एका मंदिरात माझं कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं. मात्र गैर हिंदू असल्या कारणाने तुम्ही मंदिरात प्रदर्शन करू शकत नसल्याचं मंदिराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. रंगमंचावर धार्मिक आधारावर सादरीकरणास मान्यता देण्यात आली आहे. तुम्ही चांगले नर्तक असलात किंवा नसलात तरी तुम्हाला परफॉर्म करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे ही वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री बनण्यासाठी मोदी-शाहांचा मास्टर प्लॅन? काय भाजपची नवीन खेळी? हिंदूसोबत लग्न करण्यावरुनही सवाल... मानसियाच्या अडचणी येथेच संपत नाहीत. तर तिने धर्म परिवर्तन करून हिंदू धर्म स्वीकारल्यावरुनही सवाल उपस्थित केले जातात. मानसियाने हिंदू संगीतकार श्याम कल्याणसोबत लग्न केलं आहे. मानसिया सांगते की, माझा कोणताही धर्म नाही. आता तुम्हीच सांगा मी कुठे जाऊ. मानसियाने सांगितलं की, वारंवार तिच्यासोबत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही एका श्रीकृष्ण मंदिरात तिला प्रदर्शन करण्यास रोखलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या