नवी दिल्ली 15 सप्टेंबर : अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये जंगलात लागलेली आग आता हायवेपर्यंत पोहोचली आहे. या संदर्भात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने (Stanford University) केलेल्या एका अभ्यासात असं समोर आलं आहे, की जंगलातल्या या आगीचा गर्भवती महिला आणि त्यांच्या उदरात वाढत असलेल्या बाळांवर विपरित परिणाम होऊ शकतो. या दुष्परिणामांमुळे तब्बल सात हजार बालकांचा जन्म वेळेआधी होण्याचा (Premature Birth) धोका वर्तवण्यात आला आहे. 2006 ते 2012 या कालावधीत 10 लाख गर्भवती महिलांवर (Pregnant Women) धुराच्या झालेल्या संभाव्य प्रतिकूल परिणामांचा शोध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात लावण्यात आला होता. अशा बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. या अभ्यासाबद्दलचा लेख याच महिन्यात एन्व्हायर्न्मेंटल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. काबूल स्फोटात हरवला 3 वर्षांचा अली; अखेर कॅनडात आई-वडिलांजवळ पोहोचलाच या संशोधनासाठी कॅलिफोर्नियातल्या (California) जंगलातल्या आगीचा धूर पसरलेल्या (Fire in Forests of USA) प्रत्येक ठिकाणाच्या झिप कोडशी तिथे जन्मलेल्या बाळांच्या नोंदी जोडण्यात आल्या. गर्भवती असताना महिला जितका अधिक काळ जंगलाच्या आगीच्या संपर्कात राहिली, तितकीच तिची प्रसूती वेळेआधी होण्याची शक्यता अधिक होती, असं या संशोधनात आढळलं. मध्यम ते गंभीर धोका असलेल्या स्थितीचे दुष्परिणाम खूप जास्त होते, असंही नोंदवण्यात आलं. या अभ्यासाविषयीच्या लेखाचे मुख्य लेखक सॅम हेफ्ट आणि नील यांनी सांगितलं, ‘एक आठवडा धुराशी संपर्क आल्यास धोका पाच टक्क्यांनी वाढत असल्याचं लक्षात आलं. वेळेच्या एक महिना आधी जन्म होण्याच्या प्रमाणात 20 टक्के वाढ झाली.’ धूम्रपान आणि वायुप्रदूषणाचे छोटे कण म्हणजेच पीएम 2.5 (pm 2.5) यांचा मानवी शरीरावर खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, स्ट्रोक किंवा अस्थमा किंवा मानसिक विकारही होऊ शकतात. कॅलिफोर्नियात 2008 साली 2000 बालकांचा जन्म वेळेआधी झाला. त्यासाठी जंगलात लागलेल्या आगीचा धूर कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार कठीण वायुप्रदूषणामुळे मेंदू आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. स्ट्रोक (पक्षाघात), डिमेन्शिया, पार्किन्सन्स (कंपवात) असे मेंदूशी निगडित विकार वायुप्रदूषणामुळे होऊ शकतात. कंजक्टिव्हायटिस, ब्लेफेराइटिस, मोतिबिंदू यांसारखे डोळ्यांचे विकारही वायुप्रदूषणामुळे होऊ शकतात. हृदय आणि फुप्फुसांसाठीही (Lungs) वायुप्रदूषण खूप धोकादायक असतं. हृदयविकार, हायपरटेन्शन (Hypertension), हृदयक्रिया बंद पडणं, अस्थमा यांसारखे गंभीर विकार त्यामुळे होऊ शकतात. फुप्फुसांचा कॅन्सर, तसंच अत्यंत गंभीर ब्राँकायटिसदेखील यामुळे होऊ शकतो. अमेरिकेच्या वायव्य भागाला लॉस एंजलीसशी जोडणाऱ्या हायवेचा 70 किलोमीटरचा भाग आगीच्या कारणामुळं बंद करण्यात आला आहे. 30 किलोमीटर भागात धुराचं वातावरण आहे. डिक्सीमध्ये याच वर्षी आगीमुळे 10 लाख एकरहून अधिक क्षेत्रावरचं जंगल जळून नष्ट झालं आहे. अमेरिकेत दर वर्षी जंगलात आगीच्या सात ते 10 हजार घटना घडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.