Home /News /videsh /

बांगलादेशातील मादी गेंड्यालाही सहन होत नाही आहे जोडीदाराचा विरह, सोडलं अन्नपाणी!

बांगलादेशातील मादी गेंड्यालाही सहन होत नाही आहे जोडीदाराचा विरह, सोडलं अन्नपाणी!

कोरोना काळात माणसांना आपल्या चाहत्यांपासून दूर राहिल्याने विरह सहन करावा लागला तसाच प्राणी आणि जनावरांनाही करावा लागला.

ढाका, 18 जानेवारी: माणसाला माणसाची ओढ असणं स्वाभाविक आहे. आपल्या घरातील एखादी व्यक्ती मरण पावली तर तिचा दुरावा आपल्याला सहन होत नाही. त्यात जोडीदाराचा मृत्यु ही तर आणखी दु:खाची घटना. कोरोना काळात माणसांना आपल्या चाहत्यांपासून दूर राहिल्याने विरह सहन करावा लागला तसाच प्राणी आणि जनावरांनाही करावा लागला. आता नुकतंच प्राण्याच्या विरहाचं एक उदाहरण दिसून आलं आहे. बांगलादेशच्या ढाक्यातील नॅशनल झूमध्ये असलेल्या कांची या मादी गेंड्याला जोडीदाराचा विरह सहन होत नाही आहे. अगदी माणसासारखंच तिनीही अन्नपाणी सोडलंय त्यामुळे तिचा सांभळ करणारे फरिद मियाँ आणि झू क्युरेटर अब्दुल लतिफ चिंतेत पडले आहेत. हेही वाचा...देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्ण कांचीची देखभाल करणारे फरिद मियाँ म्हणाले, ‘मी कांचीला मिठी मारतो. तिच्या गळ्याखाली खाजवून लाड करतो. पण सध्या ती त्याला प्रतिसाद देत नाही. तिनी अन्न पाणी सोडलंय आणि तिचे मूडस्विंग वाढले आहेत. झू बघायला येणारे पर्यटक, प्रेक्षक यांच्याशीही ती नीट वागत नाही. एका ठिकाणी बसून राहते. तिचा जोडीदार गेंडा 2014 मध्ये मरण पावल्यानंतर ती एकटी पडली आहे आणि त्याचाच तिला त्रास होत आहे.’ असा आहे कांचीचा आहार कांची दिवसाला सहा किलो राइसब्रान आणि एक किलो चणे खाते. गेली अनेक वर्षं कांची एकटी आहे आता तर ती माझ्या हाकांनाही ओ देत नाही असंही फरिद मियाँनी सांगितलं. झूचे क्युरेटर अब्दुल लतिफ म्हणाले,‘आपण तुला लवकरच जोडीदार आणू असं मी कांचीला सांगितलंय पण अधीर झाली आहे. आम्ही आफ्रिकेतून तिच्यासाठी नर जोडीदार आणण्याचे प्रयत्न केले पण कोरोनामुळे ते निष्फळ ठलले.’ती एकटी आहे याची जाणीव आम्हाला आहे तिच्यासाठी योग्य असा जोडीदार शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. हेही वाचा....एका Blood testमुळे वाचू शकतो कोरोना रुग्णांचा जीव; आधी समजणार मृत्यूचा धोका किती? पाकिस्तानातील एकट्या पडलेल्या कावान नावाच्या हत्तीला कंबोडियातील जंगलात सोडण्याची बातमी कळाल्यावर कांचीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पण कांचीवर लक्ष देणाऱ्यांना तिला जंगलात सोडावंसं वाटत नाही. त्याबद्दल मियाँ म्हणाले, ‘गेंडा झूमध्ये साधारणपणे 38 वर्षं जगतो. कांची वयात आली आहे. तिचं अजून भरपूर आयुष्य आहे. त्यामुळे आम्ही तिच्यासाठी जोडीदार शोधणार आहोत तिची तब्येत आता बरी आहे.’
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या