मराठी बातम्या /बातम्या /विदेश /डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?

डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?

डेल्टा विषाणूनंतर (Delta Virus) आता RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल वायरसनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बालकंही (Newborn babies) 17 कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत.

डेल्टा विषाणूनंतर (Delta Virus) आता RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल वायरसनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बालकंही (Newborn babies) 17 कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत.

डेल्टा विषाणूनंतर (Delta Virus) आता RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल वायरसनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बालकंही (Newborn babies) 17 कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत.

वॉशिंग्टन, 03 ऑगस्ट: कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यात अडकलेलं संपूर्ण जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाचा विषाणू (Corona Virus) सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हानं निर्माण करत आहे. त्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. भारतात आढळलेला डेल्टा विषाणूनंतर (Delta Virus) आता अमेरिकेत RSV अर्थातच रेस्पिरेटरी सिन्शियल वायरसनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अगदी 2 आठवड्यांच्या नवजात बालकापासून (Newborn babies) 17 वर्षांच्या युवकांपर्यंत अनेकजण या विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत.

यामुळे अमेरिकेत आता डेल्टा विषाणूसोबतच RS विषाणूबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला तर काय करायचं? हा प्रश्न आता तज्ज्ञांना सतावू लागला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेत न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, जून महिन्यापासून अमेरिकेत RSV बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्यात या विषाणू बाधित रुग्णांचा दर खूपच जास्त होता.

हेही वाचा- चीन: एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण; शहरातील सर्व लोकांची होणार चाचणी

काय आहेत RS विषाणूची लक्षणं?

RSV ची बाधा झाल्यावर नाक वाहणं, खोकला येणं, शिंका येणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसू शकतात. ह्युस्टनमधील टेक्सास चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ हीदर हक यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "मागील काही महिन्यांपासून शून्य ते अगदी नवजात बालकांना कोरोना विषाणूची बाधा होतं आहे. नवजात बालकं, लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना कोरोनाची बाधा झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे."

हेही वाचा-कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?

न्यूयॉर्क टाइम्सच्या आकडेवारीनुसार, मागील काही दिवसांपासून अमेरिकेत नव्यानं कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होतं आहे. गेल्या दोन आठवड्यांत 148 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. तर, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे कोरोना बाधित रुग्णांचा आलेख वाढला असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावल्यानं ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: America, Corona spread, Corona updates