वुहान, 03 ऑगस्ट: चीनमधील (China) वुहान (Wuhan) शहरात कोरोना विषाणूचा उद्भाव झाल्यानंतर, पुढील काही काळातचं चीननं वुहान शहारात कोरोना विषाणूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं होतं. पण एक वर्षानंतर (After one year) आता वुहानमध्ये पुन्हा एकदा नव्यानं एक कोरोना बाधित रुग्ण (Corona infected new case) आढळला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनानं सतर्कतेची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी वुहान हे शहर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत पहिल्या स्थानावर होतं. यानंतर पुन्हा याठिकाणी कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे.
वुहानमधील स्थानिक प्रशासकीय अधिकारी ली ताओ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, लवकरच शहरातील सर्व लोकांची न्यूक्लियक अॅसिड चाचणी घेण्याचं अभियान सुरू करण्यात येणार आहे. चीनमधील वुहान शहराची लोकसंख्या 1 कोटीहून अधिक (11 दशलक्ष) आहे. त्यामुळे एवढ्या व्यापक प्रमाणात ही चाचणी केली जाणार आहे.
हेही वाचा-अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
यापूर्वी सोमवारी, वुहानमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं की, शहरातील स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोना संसर्गाची 7 स्थानिक रुग्ण आढळले आहेत. 2020 च्या सुरुवातीच्या महिन्यांतच चीननं वुहानमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता नव्यानं कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे मागील जवळपास एक वर्षाच्या कालावधीत वुहानमध्ये कोरोना संसर्गाचे एकही स्थानिक रुग्ण आढळला नाही.
हेही वाचा-कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?
वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर चीननं आपल्या सर्व नागरिकांना त्यांच्या घरात कैद केलं होतं. यासह, घरगुती वाहतूक सुविधा देखील बंद केली होती. तसेच कोविड चाचणीसाठी एक मोठी मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गानं थैमान घातलं होतं. वुहान हे जगातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी एक होतं.
हेही वाचा-चीनच्या Wuhan lab मधूनच लीक झाला होता कोरोना; अमेरिकेला सापडला पुरावा
चीनमध्ये मंगळवारी एकूण 61 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चीनच्या नानजिंग विमानतळावरील सफाई कामगारांना डेल्टा विषाणूचं संक्रमण झाल्यानंतर, विषाणूचा संसर्ग चीनमधील अनेक शहरांत पसरला आहे. डेल्टा विषाणूच्या संक्रमणाचा वेग खूपच जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या विविध भागातून कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona spread