मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

चिंताजनक! कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?

चिंताजनक! कांजण्याप्रमाणेच पसरतोय डेल्टाचा संसर्ग, लसीकरण झालेल्या लोकांनाही धोका?

कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यात अडकलेलं सगळं जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाचा विषाणू (Corona Virus) सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हानं निर्माण करत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 31 जुलै: कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यात अडकलेलं सगळं जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाचा विषाणू (Corona Virus) सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हानं निर्माण करत आहे. त्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. भारतात आढळलेला डेल्टा विषाणू (Delta Virus) हा मानवांमध्ये गंभीर आजार निर्माण करत असल्याचा धक्कादायक अहवाल अमेरिकेच्या (America) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. कांजण्यांच्या (Chickenpox) विषाणूप्रमाणे डेल्टाचा संसर्ग पसरत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

चिंतादायक बाब म्हणजे कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या विषाणूचा प्रसार केला जाऊ शकतो, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे लसीकरण घेतलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे.  एका सरकारी निवेदनाच्या अधारे द वॉशिंग्टन पोस्टनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा-कोरोनाचा नवा व्हेरियंट महाघातक, अमेरिकेकडून शिक्कामोर्तब

द वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, डेल्टा विषाणूचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या विषाणूचा प्रसार करू शकतात. पण प्रत्येक वेळी असंच घडेल, हे मात्र नक्की नाही. डेल्टा विषाणू हा मर्स, सार्स, इबोला, सर्दीचा विषाणू, मोसमी फ्लू अशा विषाणूंइतकात वेगानं पसरतो. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणू इतकाच संसर्गजन्य असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिलं आहे.

हेही वाचा-कोरोनाने रूप बदलल्यावर लक्षणंही बदलली, लस घेतलेल्यांनाही सावध राहण्याचा इशारा!

अलीकडेच अमेरिकेत (USA) देखील एक दुर्मिळ मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला (Nigeria) जाऊन परत आला होता. त्याच्यावर डलास येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकेत या रोगाचा हा पहिलाच रुग्ण आढळला असल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं (Center for Disease control and Prevention-CDC) म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Delta virus