मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ

कोरोनापाठोपाठ आणखी एक संकट! संसर्गजन्य Monkeypox चा रुग्ण आढळल्यानं खळबळ

नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला (Nigeria) जाऊन आला होता.

नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला (Nigeria) जाऊन आला होता.

नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला (Nigeria) जाऊन आला होता.

नवी दिल्ली 17 जुलै : कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) विळख्यात अडकलेलं सगळं जग त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, कोरोनाचा विषाणू सतत आपली रचना बदलत दररोज नवनवीन आव्हानं निर्माण करत आहे. हे ही कमी आहे म्हणून की काय, काही इतर विषाणूंची लागणही होत असल्याचं आढळत आहे. त्यामुळं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत (USA) नुकताच दुर्मिळ मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. टेक्सास प्रांतात हा रुग्ण आढळला असून तो नुकताच नायजेरियाला (Nigeria) जाऊन आला होता. त्याच्यावर डलास (Dallas) इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकेत या रोगाचा हा पहिलाच रुग्ण आढळला असल्याचं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं (Centre for Disease control and Prevention-CDC) म्हटलं आहे.

सतर्क रहा! लस घेतल्यानंतर ही लक्षणं आढळल्यास जराही दुर्लक्ष करु नका

या रुग्णात आढळलेला विषाणू आफ्रिकी देशामध्ये (African Countries) नेहमीच आढळणारा आहे. यापूर्वी नायजेरिया, ब्रिटन, सिंगापूर, इस्रायल इथं भेट देऊन आलेल्या सहा प्रवाशांनांही या आजाराची लागण झाल्याचे आढळले होते. अमेरिकेत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून, रुग्णसंख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत आणखी एखादा साथीचा रोग पसरणे धोकादायक ठरू शकतं. मात्र आणखी रुग्ण आढळलेला नसल्यानं आणि यावर उपचार उपलब्ध असल्यानं हा आजार पसरण्याचा धोका वाटत नसल्याचं मत डलासचे कौंटी जज्ज क्ले जेनकिन्स यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत या आधी 2003 मध्ये या आजाराचा फैलाव झाला होता. तर 1970 मध्ये नायजेरियासह मध्य आणि पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये या रोगाचा उगम झाला होता. हा एक स्मॉलपॉक्ससारखा (Smallpox) आजार आहे. म्हणजे गोवर, कांजण्या या प्रकारचा हा आजार आहे. हा संसर्गजन्य असून, तो श्वास घेताना किंवा खोकताना, शिंकताना उडणाऱ्या द्रवबिंदूतून याचा प्रसार होतो. याची लागण झाल्यानंतर फ्लूसारखी लक्षणं दिसतात. घसा दुखतो, ताप येतो. नंतर चेहऱ्यावर, शरीरावर फोड येऊ लागतात. मात्र या विषाणूवर लस उपलब्ध आहे. त्यामुळं धोक्याचं कारण नाही.

Corona Alert : लस घेऊनही कोरोना झालेल्या 80 टक्के नागरिकांमध्ये डेल्टा व्हायरस

अमेरिकेत सापडलेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. या व्यक्तीनं विमान प्रवासात मास्कचा (Mask) वापर केल्यानं धोका कमी असल्याचंही अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन संस्थेनं(CDC) म्हटलं आहे. ही काळजी घेणं खूप गरजेचं असल्याने नागरिक ही काळजी घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Rare disease, Serious diseases