• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोरोना लस घेतलेल्यांना गुलियन बैरे सिंड्रोम आजार, जाणून घ्या या आजाराची लक्षणे

कोरोना लस घेतलेल्यांना गुलियन बैरे सिंड्रोम आजार, जाणून घ्या या आजाराची लक्षणे

Guillain Barre Syndrome: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र लस (Corona vaccine) घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गुलियन बैरे सिंड्रोम हा आजार आढळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 जुलै: देशात कोरोनाचा व्हायरसचा (Corona Virus) प्रार्दुभाव अजूनही आहे. दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत नाही तोवर तिसऱ्या लाटेचा (Third Wave) संभाव्य धोका असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र लस (Corona vaccine) घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गुलियन बैरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा आजार आढळून आल्याचं वृत्त समोर आलं आहे. कोरोना लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा अशी समस्या बहुतेकांना उद्भवते आहे. पण काही जणांच्या चेहऱ्यावर याचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. कोविशिल्ड (Covishield Vaccine) लस घेतल्यानंतर गंभीर असा सिंड्रोम झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना लशीबाबत भारत एक संशोधन झालं. त्यामध्ये कोविशिल्डची लस घेतल्यानंतर भारतात काही जणांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दिसून आला आहे. या गुलियन बेरी सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) असं म्हटलं जातं. हा आजार पुढे गंभीर स्वरुप धारण करू शकतो. यामुळे लकवा मारण्याचा धोकाही संभवतो. लोकमतनं दिलेल्या एका वृत्तात, एका अभ्यासानं केलेल्या दाव्यानुसार, कोविडची लस घेतल्यानंतर भारतातील लोकांना गुलियन बैरे सिंड्रोम होण्याची शक्यता आहे. हा रोग रोगप्रतिकारक यंत्रणेवर परिणाम करतो. गुलियन बैरे सिंड्रोम ही एक न्यूरोलॉजिकल समस्या असून ज्यामध्ये शरीराची प्रतिकारक शक्ती निरोगी ऊतींवर परिणाम करते. कमाल! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी होणार 'ग्रॅज्युएट', पाहा BA ची मार्कशीट गुलियन बेरी सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आहे. हा नर्व्हस सिस्टमशी संबंधित एक आजार आहे. यामध्ये इम्युनिटी आणि नर्व्हस सिस्टममधील निरोगी टिश्य़ूजवर हल्ला करतात. यात प्रामुख्याने चेहऱ्यावरील नसा कमजोर होतात. जर हा आजार संपूर्ण शरीरभर पसरला तर त्या व्यक्तीला लकवा मारू शकतो. गुलियन बेरी सिंड्रोममुळे अशक्तपणासह, शरीरात वेदना आणि चेहरा लटकणे या समस्यांचा देखील समावेश आहे. ज्या लोकांनी कोरोना लस घेतली आहे. त्यानंतर त्यांना हा सिंड्रोम असल्याचे दिसून आले. त्यांना पायामध्ये मुंग्या येणे, शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना आणि बोलण्यात समस्या यासारख्या समस्या उद्भवतात. भारतात अशी सात प्रकरणं आढळून आल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये कऱण्यात आला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 10 ते 22 दिवसांतच या सिंड्रोमची लक्षणं दिसू लागली. लोणावळ्यात पर्यटकांनी धुडकावला कलम 144, भुशी डॅमवरील गर्दीचा LIVE VIDEO काय आहेत लक्षणे शरीरात अत्यंत अशक्तपणा, बोटांमध्ये-गुडघ्यांमध्ये किंवा मनगटात टोचल्यासारखे होणे, चेहऱ्यावरील स्नायू लटकणे, अशक्तपणा आणि पाय दुखणे, चालण्यात अडचण, बोलणे आणि खाण्यात अडचण, डोळे दुखणे, शरीरात पेटके येणे, रक्तदाब पातळी असंतुलन, धाप लागणे.
  Published by:Pooja Vichare
  First published: