मास्क न घालणं चांगलंच महागात! शिक्षा भोगता भोगता नागरिकांना फुटला घाम

मास्क न घालणं चांगलंच महागात! शिक्षा भोगता भोगता नागरिकांना फुटला घाम

बिनामास्क फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांना स्थानिक पोलिसांनी 50 पुश अप्स मारायला लावल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी मास्क व्यवस्थित घातलेलं नाही अशा परदेशी पर्यटकांना 15 पुशअप्स मारायला लावल्या.

  • Share this:

जकार्ता, 22 जानेवारी : जगभरात कोरोना काळात मास्क लावणं, सर्वात परिणामकारक उपायांपैकी एक ठरतं आहे. अनेक ठिकाणी मास्क न घातल्यास मोठ्या किंमतीचा दंडही आकारण्यात येत आहे. पण असा एक देश आहे, जिथे मास्क न घातल्यास किंवा कंटाळा केल्यास, पुढे जे घडेल ते तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. कारण बिनामास्कचे दिसलात, तर दंड होऊ शकतो. हा दंड केवळ पैशांचाच नाही, तर रस्त्यावर सर्वांसमोर पुशअप्स मारण्याचा आहे.

बाली बेटावर बिनामास्क फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांना स्थानिक पोलिसांनी 50 पुश अप्स मारायला लावल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी मास्क व्यवस्थित घातलेलं नाही अशा परदेशी पर्यटकांना 15 पुशअप्स मारायला लावल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरलही केला जातो आहे.

पर्यटक पुशअप्स मारताना त्यांच्या शेजारी पोलीस उभे राहतात आणि हा संपूर्ण प्रकार नागरिकही पाहतात. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत 70 फॉरेनर्सनी 1 लाख इंडोनेशियन rupiah दंड भरला आहे. तर, 30 जणांनी त्यांच्याकडे पैसेच नसल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांना शेवटी पुशअप्सची शिक्षा केल्याचं, पोलीस अधिकारी म्हणाले.

(वाचा - अजिंक्य रहाणेचं फिल्मी कनेक्शन; म्हणून मुलाचं 'अजिंक्य' ठेवलं, रहाणेच्या बाबांनी सांगितलं कारण)

पहिल्यांदा काही जणांनी त्यांना नियमच माहित नसल्याचं सांगितलं. काहींनी विसरलो किंवा मास्क ओला झालाय किंवा मास्क खराब झालाय म्हणून घातलं नसल्याचं सांगितलं. मात्र तोंडाला मास्क न लावलेल्या व्यक्तीला 50 पुशअप्स आणि तो नीट न लावणाऱ्याला 15 पुशअप्स असा दंड करायला सुरुवात केली. आम्ही तिथं उभं राहून त्यांच्याकडून पुशअप्स मारून घेत असल्याचं, पोलिसांनी सांगितलं.

(वाचा - 68 वर्षीय पुतिन यांची 37 वर्षांची गर्लफ्रेंड;सरकारी तिजोरीतून खर्चाचा होतोय आरोप)

गेल्यावर्षी कोरोना महामारीचा मोठा फटका इंडोनेशियाला बसला आहे. त्यामुळे तिथे कोरोनासंबंधी नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. बालीमधील अधिकाऱ्यांनी, तर कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला देशातून बाहेर पाठवलं जाईल असंही सांगितलंय. पण अजूनतरी असं घडलेलं नाही. बाली हे बेट पाहायला जगभरातील नागरिक येतात. अनेक फॉरेनर्सची घरंच तिथं आहेत. त्यामुळे पर्यटन पूर्णपणे सुरू नसतानाही इथं फॉरेनर्सची वर्दळ सुरूच असते. त्यामुळे कडक नियम पाळावे लागतात.

Published by: Karishma Bhurke
First published: January 22, 2021, 3:59 PM IST

ताज्या बातम्या