Home /News /videsh /

68 वर्षीय पुतिन यांची 37 वर्षांची गर्लफ्रेंड; कोण आहे जिच्यावर सरकारी तिजोरीतून खर्चाचा होतोय आरोप

68 वर्षीय पुतिन यांची 37 वर्षांची गर्लफ्रेंड; कोण आहे जिच्यावर सरकारी तिजोरीतून खर्चाचा होतोय आरोप

गेल्या काही काळापासून राष्ट्रपती पुतिन यांचं अफेयर माजी ऑलिंम्पिक चॅम्पियन एलिना कबाएवासह (Alina Kabaeva) असल्याचा दावा केला जात आहे.

  मॉस्को, 22 जानेवारी : रशियामध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रपदी व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे शत्रू मानले जाणारे एलेक्सी नावलनी (Alexei Navalny) यांनी रशियात पुन्हा आपला मोर्चा पुतिन यांच्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नावलनी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये राष्ट्रपदी पुतिन यांच्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. त्यापैकी एक दावा पुतिन यांच्या आयुष्यातील महिलांबाबतही आहे. पुतिन आपल्या कथित गर्लफ्रेंडवर (Putin Girlfirend) सरकारी खजाना लुटत असल्याचा आरोप नावलनी यांनी केला आहे. तसंच, पुतिन त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर आणि 17 वर्षीय आपल्या मुलीवरही मोठी संपत्ती लुटत असल्याचं नावलनी यांनी म्हटलं आहे. पुतिन याचं काला सागर तटाजवळ 100 अब्जांचा घर असल्याचाही दावा करण्यात आला आहे. हे घर अतिशय अलिशान असून यात अनेक सुख-सुविधा असल्याचं म्हटलं जात आहे.

  (वाचा - पुतिन यांची कमाल, गोठलेल्या थंडगार पाण्यात मारली डुबकी, काय आहे हा प्रकार?)

  गेल्या काही काळापासून राष्ट्रपती पुतिन यांचं अफेयर माजी ऑलिंम्पिक चॅम्पियन एलिना कबाएवासह (Alina Kabaeva) असल्याचा दावा केला जात आहे. 37 वर्षीय एलिनाने 2004 ऑलिंम्पिकमध्ये जिम्नॅस्टमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्याआधी 2000 ऑलिंम्पिकमध्ये तिला कांस्य पदक मिळालं होतं. 1983 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये जन्मलेल्या एलिनासह पुतिन यांचं नाव पहिल्यांदा 2008 मध्ये जोडलं गेलं. 2013 मध्ये पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर पुतिन यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

  (वाचा - White House सोडल्यावर डोनाल्ड ट्रम्प राहायला कुठं गेले पाहा; डोळे विस्फारतील)

  2017 मध्ये एलिना प्रेग्नेंट असल्याचीही अफवा होती. एलिना जुळ्या मुलांची आई झाल्याचीही मोठी चर्चा होती. आता नावलनी यांनी दावा केला आहे की, पुतिन सरकारी खजान्यातील मोठी संपत्ती एलिनावर खर्च करतात, ज्यावर रशियातील गरीब लोकांचा अधिकार आहे. एवढंच नाही, तर सरकारी पैशातून एलिनाच्या आजीलाही सेंट पीटर्सबर्गमध्ये घर घेऊन देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एलिनाची अधिकृत सॅलरी वार्षिक 75 कोटी रुपये असून ती रशियाच्या मीडियावर आपलं नियंत्रण ठेवत असल्याचंही बोललं जात आहे. नावलनी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये क्रिवोनोगिख नावाच्या एका मोलकरणीसोबतही पुतिन यांचे संबंध असल्याचं म्हटलं आहे. या दोघांना मुलंही आहेत. ही महिला आश्चर्यकारकरित्या श्रीमंत झाली असून तिच्याकडे 118 फूट यॉच असल्याचंही नावलनी यांनी म्हटलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या