जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / जुळ्या भावाला तुरुंगात ठेवून स्वतः बाहेर पडण्याच्या तयारीत होता कैदी; शेवटच्या क्षणी पलटला डाव

जुळ्या भावाला तुरुंगात ठेवून स्वतः बाहेर पडण्याच्या तयारीत होता कैदी; शेवटच्या क्षणी पलटला डाव

जुळ्या भावाला तुरुंगात ठेवून स्वतः बाहेर पडण्याच्या तयारीत होता कैदी; शेवटच्या क्षणी पलटला डाव

कुत्रा चोरल्याचा आरोप असलेला २४ वर्षीय एलहाज यूकेच्या तुरुंगात बंद आहे. नुकतंच त्यानं असं काम केलं की जेलमधून बाहेर पडण्यात तो जवळजवळ यशस्वी झालाच होता, परंतु अचानक सर्वकाही उलटलं आणि त्याची शिक्षा वाढली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 एप्रिल : जे लोक जुळे आहेत त्यांना याची कल्पना असते, की अनेकदा एकाच चेहऱ्याचे दोन लोक असणं किती फायदेशीर असतं. आपले चेहरे सारखेच असल्याचा फायदा ते अनेकदा उचलतात. अलीकडेच इंग्लंडमधील एका कैद्यानेही आपल्या जुळ्या भावाचा फायदा घेण्याची योजना आखली, पण तो सपशेल अपयशी ठरला. भावाला त्याच्या जागी ठेवून स्वतः बाहेर जाण्याचा त्याचा बेत होता (Prisoner Tried Jail Break by Switching Place with Twin Brother), पण पोलिसांच्या हुशारीमुळे हा बेत उधळला. ऐकावं ते नवल! या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; अखेर प्रशासनाने उचललं मोठं पाऊल डेली स्टारच्या वृत्तानुसार, कुत्रा चोरल्याचा आरोप असलेला २४ वर्षीय एलहाज यूकेच्या तुरुंगात बंद आहे. नुकतंच त्यानं असं काम केलं की जेलमधून बाहेर पडण्यात तो जवळजवळ यशस्वी झालाच होता, परंतु अचानक सर्वकाही उलटलं आणि त्याची शिक्षा वाढली. झालं असं की एलहाजला एक जुळा भाऊदेखील आहे. जो नुकताच तुरुंगात त्याला भेटण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांसह आला होता. एका पोलीस सूत्राने सांगितलं की, कारागृहाच्या एका भागात कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी आहे. त्या खोलीत काचेच्या भिंतीसारखी कोणतीही बंधनं किंवा अडथळे नसतात. त्यामुळे कैदी एकमेकांना समोरासमोर भेटू शकतात, स्पर्श करू शकतात. जेव्हा एलहाजचे कुटुंबीय त्याला भेटायला आले, तेव्हा त्यांनी काही वेळ आपासात गप्पा मारल्या आणि नंतर एलहाजने हळूच तुरुंगातील आपलं बँड आपल्या जुळ्या भावाकडे दिलं, ज्यावरुन कैद्यांची ओळख पटवली जाते. भेटीची वेळ संपल्यानंतर एलहाजचा भाऊ आपोआप इतर कैद्यांसोबत जाऊ लागला आणि मुख्य आरोपी हळूहळू आपल्या कुटुंबीयांसोबत इथून बाहेर पडू लागला. लग्नासाठी पाहिलेल्या मुलासोबत असं काही केलं की…; लेकीचा प्रताप पाहून वडीलही शॉक एका पोलीस कर्मचाऱ्याने हे सर्व अतिशय काळजीपूर्वक पाहिल्याने हा प्लॅन फिसकटला. त्याच्या लक्षात आलं की जेव्हा एलहाज कुटुंबीयांना भेटण्यासाठी खोलीत आला तेव्हा त्याचे कपडे वेगळे होते आणि जेव्हा तो इतर कैद्यांसह माघारी जात होता तेव्हा त्याचे कपडे वेगळे होते. हे पाहून पोलिसाला समजलं की काहीतरी गडबड आहे. त्याने लगेच या कुटुंबाला बाहेर जाण्यापासून रोखलं आणि एलहाजला ताब्यात घेतलं. या प्रकरणानंतर एलहाजला तुरुंगातून पळ काढणाऱ्या कैद्यांच्या यादीत टाकण्यात आलं आणि त्याला यूकेच्या मिल्टन केन्स येथील कॅटेगिरी ए वुडहिल तुरुंगात पाठवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात