मुंबई, 02 मे : आपल्या मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रत्येक आईवडील धडपड करत असतात. मुलीच्या लग्नाची अशीच चिंता लागून राहिलेल्या एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी उत्तम वर शोधला. तिला त्याचा बायोडेटाही पाठवला. पण मुलीने त्या मुलासोबत जे केलं ते पाहून वडिलांना धक्काच बसला (Daughter do such things with groom father shocked). बंगरूळुरीतील स्टार्ट अप साल्टची को-फाऊंडर उदिता पाल, जिच्या वडिलांनी तिला एक मॅचमेकर प्रोफाइल पाठवलं होतं. पण तिने त्याच्यासोबत असं काही केलं ज्याचा वडिलांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने याबाबत आफल्या वडिलांनाही माहिती दिली. त्यानंतर तिचे वडील भडकले. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर जे चॅट झाले त्याचा स्क्रिनशॉट तिने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी वडिलांनी म्हटलं, “मी तुझा मेसेज पाहिला. तू त्याला मुलाखतीची लिंक पाठवलीस आणि त्याच्याकडे बायोडेटा मागितला. तू मॅट्रिमोनिअल साइट्सच्या लोकांना कामावर नाही ठेवू शकत. आता त्यांना काय सांगायचं?”
What getting disowned from father looks like. pic.twitter.com/nZLOslDUjq
— Udita Pal 🧂 (@i_Udita) April 29, 2022
उदिता पाल म्हणाली, “त्या व्यक्तीला फिनटेकचा 7 वर्षांचा अनुभव आहे. खूप चांगलं आहे हे. त्याच्या फिनटेकचा अनुभव चांगला आहे आणि आम्ही त्याला नोकरीवर ठेवत आहे” हे वाचा - लग्नाच्या काही दिवस आधीच गर्लफ्रेंडनं केला ब्रेकअप; भडकलेल्या तरुणाने अतिशय विचित्र पद्धतीने घेतला बदला आता उदिताने जे केलं ते योग्य आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.