मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवल! या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; अखेर प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

ऐकावं ते नवल! या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; अखेर प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

या गावात फक्त मुलीच जन्माला का येतात याचा अभ्यास सुरू असून अद्याप वैज्ञानिकांनाही याचं रहस्य उलगडलेलं नाही.

  • Published by:  Priya Lad

वॉरसॉ, 02 मे : एखाद वर्षी मुलं (Baby born) जास्त जन्माला येतात किंवा मुली. म्हणजे ही संख्या पुढे-मागे होते. पण असं एकही वर्ष नसेल की त्यावर्षी फक्त मुलं (Baby boy born) किंवा फक्त मुलीच जन्माला (Baby girl born) आल्या. पण जगात एक असं गाव आहे, जिथं एक-दोन तर गेली बारा वर्षे फक्त मुलीच जन्माला आल्यात. एकही मुलगा जन्माला आला नाही (Only girl born in mysterious village).

पोलंडमधील (Poland) मिजेस्के ओद्रजेनस्की  (Miejsce Odrzanskie) गाव. रिपोर्टनुसार जवळपास 300 लोकसंख्या असलेलं गावं. जिथं दशकभरापासून एकाही मुलाचा जन्म झाला नाही. यामुळे वैज्ञानिकही हैराण आहेत. या अजब गावाबाबत प्रत्येक जण अभ्यास करत आहेत. अग्निशमनच्या युथ वॉलिंटियर्सच्या एका क्षेत्रीय स्पर्धदरम्यान एक पूर्ण मुलींची टीम पोहोचली तेव्हा हे गाव चर्चेत आलं.

हे वाचा - VIDEO - नादच करायचा नाय! हळदीत नाचता नाचता तरुणीच्या प्रेमात पडला; पठ्ठ्याच्या मोबाईल नंबर देण्याच्या स्टाईलवर सर्वजण फिदा

इथल्या महापौर क्रिस्टीना जिडजियाक यांनी सांगितलं, मिजेस्के ओद्रजेनस्की गावाची परिस्थिती थोडी विचित्र आणि हाताबाहेर गेलेली आहे. काही वैज्ञानिक या गावात फक्त मुलींचाच जन्म का होतो, हे शोधत आहे. पण हे रहस्त काही अजून उलगडलेलं नाही.

इतकंच नव्हे तर न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार इथल्या महापौरांनी तर मुलगा झाला तर बक्षीस जारी केलं आहे. ज्या दाम्पत्याला मुलगा होईल त्याला बक्षीस दिलं जाईल.

हे वाचा - Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

सीसेक कम्युनिटीचे महापौर राजमुंद फ्रिस्को (Rajmund Frischko) म्हणाले, काही वैज्ञानिकांना या गावात अभ्यास करायचा आहे. इथं फक्त मुलींचा जन्म का होतो हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. इतकंच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही या गावात बोलावलं जातं. मुलाच्या जन्मासाठी काय करावं लागेल याबाबत त्यांच्याकडून सल्ला घेतला जातो.

First published:

Tags: Lifestyle, Small girl, Viral