Home /News /videsh /

विमानाला रेल्वेनं दिली टक्कर, पोलिसांच्या धाडसामुळे वाचले पायलटचे प्राण

विमानाला रेल्वेनं दिली टक्कर, पोलिसांच्या धाडसामुळे वाचले पायलटचे प्राण

विमान क्रॅश झाल्यावर ते पडलं रेल्वे ट्रॅकवर.. समोरून भरधाव वेगाने येत होती ट्रेन… मोठा अपघात घडण्याची पूर्ण शक्यता होती.. मात्र तेवढ्यात पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं…

    लॉस एंजेलिस, 10 जानेवारी: टेकऑफ (Take off) केल्या केल्या क्रॅश (Crash) झालेलं विमान (Plane) एका रेल्वे ट्रॅकवर (Railway track) कोसळलं. त्याच वेळी समोरून भरधाव वेगानं रेल्वे (Railway) येत होती. अपघातामुळे जखमी झालेला विमानाचा पायलट अत्यवस्थ होता. रेल्वेची कुठल्याही क्षणी विमानाला जोरदार धडक बसणार हे स्पष्ट दिसत होतं. मात्र तेवढ्यात स्थानिक पोलिसांनी सतर्कता आणि प्रसंगावधान राखत विमानाकडे धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला.  असा घडला अपघात अमेरिकेतील पॅकोमा भागातून उड्डाण केलेलं एक विमान काही क्षणांतच क्रॅश झालं आणि खाली कोसळलं.  विमानाच्या पायलटनं प्रसंगावधान राखत हे विमान निर्जन भागात उतरवण्यात यश मिळवलं. मात्र नेमकं हे विमान एका रेल्वे ट्रॅकवर लँड झालं. समोरून जोरदार वेगानं रेल्वे येत होती. रेल्वे आणि विमानाची टक्कर होणार, हे स्पष्ट होतं. मात्र ही टक्कर झाली, तर जखमी पायलटचा जीव जाणार, हे लॉस एंजेलिसच्या पोलिसांनी ओळखलं आणि पायलटच्या दिशेनं धाव घेतली.  काही सेकंदांमुळे वाचले प्राण लॉस एंजेलिस पोलिसांनी पायलटच्या दिशेनं धाव घेत त्याला पकडलं आणि विमानातून ओढून बाहेर काढलं. पोलिसांच्या हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्यांत ही घटना कैद झाली असून व्हिडिओतून घटनेचा थरार दिसून येत आहे. पोलिसांनी पायलटचा घट्ट पकडलं आणि बाजूला खेचलं. त्यानंतर काही सेकंदांतच रेल्वेनं विमानाला जोरदार धडक दिली आणि विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. हे वाचा - कुणीही जखमी नाही या अपघातात रेल्वेतील कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे. विमानात केवळ पायलट असल्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात लॉस एंजेलिस पोलिसांना यश आलं असून त्यांचं सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. प्रसंगावधान राखत पोलिसांनी जलदरित्या हालचाली केल्या नसत्या, तर एका पायलटला आपली जीव गमवावा लागला असता. रक्तबंबाळ झालेल्या पायलटची जीव वाचवून पोलिसांनी तेच खरे हिरो असल्याचं सिद्ध झालं आहे, असा गौरव लॉस एंजेलिसच्या पोलीस विभागानं केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, America, Crash, Police, Railway

    पुढील बातम्या