Home /News /viral /

बॉसनं पगार म्हणून दिली 227 किलो चिल्लर, रागावलेल्या कर्मचाऱ्यानं ठोकला दावा

बॉसनं पगार म्हणून दिली 227 किलो चिल्लर, रागावलेल्या कर्मचाऱ्यानं ठोकला दावा

मालकाने त्याच्या कर्मचाऱ्याचा पगार तर दिला, मात्र तो काही कर्मचाऱ्याला उचलताच येईना. असं का घडलं? वाचा सविस्तर.

    न्यूयॉर्क, 10 जानेवारी: बॉसनं (Boss) आपल्या कर्मचाऱ्याला (Employee) पगार (Salary) म्हणून इतकी चिल्लर (Coins) दिली की ती उचलता उचलता त्याच्या नाकी (Heavy) नऊ आले. वास्तविक, आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देताना बहुतांश वेळा तो बँक खात्यात जमा केला जातो. ज्या ठिकाणी रोखीने पगार होतात, तिथं मोठ्या नोटांचा वापर करून पगार दिला जातो. मात्र एका मालकानं आपल्या कर्मचाऱ्याला अशा स्वरुपात पगार दिला की कर्मचाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने मालकाविरोधात दावाच ठोकल. काय आहे प्रकरण? अमेरिकेतील जॉर्जियामध्ये राहणाऱ्या एंड्रियाज फ्लॅटन हा एक कार मेकॅनिक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याचं आणि त्याच्या मालकाचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर एंड्रियाजनं नोकरी सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि मालकाला आपल्या शेवटच्या पगाराचे पैसे आणि इतर भत्ते अशी सगळी रक्कम द्यायला सांगितली. मालकानंही त्याला ठरलेल्या तारखेला सर्व रक्कम मिळेल, असं आश्वासन दिलं.  पगार दिला पण… ठरलेल्या तारखाला मालकानं एंड्रियाजला पगार दिला, मात्र चिल्लरच्या स्वरुपात. त्याची बाकी असलेली सर्व रक्कम आपण अदा करत आहोत आणि ती घेण्यासाठी त्याने यावं, असं निमंत्रण मालकाने धाडलं. एंड्रियाज पैसे घ्यायला गेला आणि समोरचं चित्र पाहून थक्क झाला. मालकाने सर्व रक्कम ही चिल्लरच्या स्वरुपात समोर ठेवली होती.  वजनदार पगार सर्व नाण्यांचं एकत्र वजन केलं असता या पगाराचं वजन तब्बल 227 किलो असल्याचं दिसून आलं. आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी मालकानं अशा प्रकारे आपल्याला पगार दिल्याची तक्रार एंड्रियाजनं केली आहे. शिवाय हे सगळे पैसे मोजल्यानंतर ठरलेल्या रकमेपेक्षा ते कमी असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. याबाबत एंड्रियाजने मालकाविरोधात दावा ठोकला आहे. हे वाचा - मालकाचे हात वर पगार वेळेत द्यायचा, एवढंच ठरलं होतं. तो कुठल्या स्वरुपात द्यावा, याबाबत काहीही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळे आपण आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं कॅश देऊ शकतो, अशी भूमिका घेत मालकानं हात वर केले आहेत. एंड्रियाजनं ही घटना सोशल मीडियावर अपलोड करत वाचा फोडली आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: Complaint, Owner, Salary

    पुढील बातम्या