मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान

म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान

पॉल 'पेन' फार्थिंग असं संबंधित ब्रिटीश नागरिकाचं नाव असून त्यांनी ब्रिटीश रॉयल मरीनमध्ये 22 वर्षे सेवा केली आहे. (फोटो-रॉयटर्स)

पॉल 'पेन' फार्थिंग असं संबंधित ब्रिटीश नागरिकाचं नाव असून त्यांनी ब्रिटीश रॉयल मरीनमध्ये 22 वर्षे सेवा केली आहे. (फोटो-रॉयटर्स)

तालिबानच्या अत्याचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. अशात एक ब्रिटीश नागरिक मात्र देश सोडायला तयार (British citizen not want to leave Afghanistan) नाही.

  • Published by:  News18 Desk
काबूल, 22 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर (Taliban Control Afghanistan) अनेक विदेशी नागरिकांसह अफगाण नागरिकही देश सोडून पलायन करत आहेत. हजारोंच्या संख्येनं अफगाण नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानच्या अत्याचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत. अशात एक ब्रिटीश नागरिक मात्र देश सोडायला तयार (British citizen not want to leave Afghanistan) नाही. जोपर्यंत माझे सर्व साथीदार सुखरुप अफगाणिस्तानातून बाहेर जात नाहीत, तोपर्यंत आपण अफगाणिस्तान सोडणार नाही, अशी भूमिका संबंधित ब्रिटीश नागरिकानं घेतली आहे. पॉल 'पेन' फार्थिंग (Paul 'Pen' Farthing) असं संबंधित ब्रिटीश नागरिकाचं नाव असून त्यांनी ब्रिटीश रॉयल मरीनमध्ये 22 वर्षे सेवा केली आहे. तालिबानच्या भीतीनं अफगाणिस्तान देशाचे राष्ट्रपती अशरफ घणी यांनी देखील देश सोडला आहे. पण फार्थिंग मात्र आपल्या साथीदारांना देशातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानातच थांबले आहेत. विशेष म्हणजे अफगाणिस्तानातून बाहेर जाण्याची संधी त्यांच्याकडे होती. पण त्यांनी तसं केलं नाही. हेही वाचा-अफगाणिस्तानच्या डोक्यावर नवं संकट, अमेरिकेनं दिला इशारा खरंतर, फार्थिंग यांनी रेस्क्यू केलेल्या एका कुत्र्याच्या आठवणीत अफगाणिस्तानात एक अॅनिमल शेल्टरची स्थापना केली होती. त्यांच्या या फाउंडेशनमध्ये जवळपास 25 अफगाणी नागरिक काम करतात. यावेळी फार्थिंग यांनी सांगितलं की, 'मी एक ब्रिटीश नागरिक आहे. अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्याची संधी माझ्याकडे होती. पण मी आत्ताच अफगाणिस्तान सोडणार नाही. जोपर्यंत माझे सर्व साथीदार कर्मचारी सुखरुप देश सोडणार नाहीत. तोपर्यंत मीही देशाबाहेर जाणार नाही.' हेही वाचा-अफगाणिस्तानच्या महिला पत्रकाराचा जीव धोक्यात; मदतीसाठी भारताकडे धाव, म्हणाली... फार्थिंग यांनी पुढे म्हटलं की 'माझे कर्मचारी अफगाणिस्तानमधील बिकट परिस्थितीत राहण्यासाठी पात्र नाहीत. त्यामुळे ते जोपर्यंत दुसऱ्या देशात जात नाहीत. तोपर्यंत मीही येथून हलणार नाही. सध्या विमानतळावर बरीच गर्दी असून सर्वत्र अराजक पसरलं आहे. विमानतळाच्या आत ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिक आहेत. तर बाहेर अफगाण नागरिकांनी गर्दी केली आहे. याठिकाणी तालिबान बंडोखोरांच्या चौक्याही आहेत. त्यामुळे अनेक अफगाण नागरिकांना बाहेर पडता येत नाहीये.
First published:

Tags: Afghanistan, Britain, Taliban

पुढील बातम्या