मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानच्या डोक्यावर घोंघावतंय नवीन संकट, IS कडून हल्ला होण्याची शक्यता; अमेरिकेनं दिला इशारा

अफगाणिस्तानच्या डोक्यावर घोंघावतंय नवीन संकट, IS कडून हल्ला होण्याची शक्यता; अमेरिकेनं दिला इशारा

Afghanistan Crisis: अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे.  लोक देश सोडून जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

Afghanistan Crisis: अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. लोक देश सोडून जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

Afghanistan Crisis: अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. लोक देश सोडून जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

अफगाणिस्तान, 22 ऑगस्ट: अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबाननं (Taliban)कब्जा घेतल्यानंतर देशाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. लोक देश सोडून जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आता अमेरिकेनं (America)दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांची चिंता आणखीनच वाढली आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यात अमेरिकेनं म्हटलं आहे की, काबूल विमानतळाजवळ (Kabul Airport) येऊ नका. काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट (IS) हल्ला करण्याची भीती त्यांना सतावतेय. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या नागरिकांना आधीच सतर्क केले आहे.

काबूल विमानतळावर सतत गोंधळ सुरूच आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोकं विमानतळावर गर्दी करत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी अमेरिकन सैन्य तैनात आहे. अफगाणिस्तानात परिस्थिती सतत बिकट होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेनं आता आपल्या नागरिकांना विमानतळाकडे जाण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. सध्या काबूल विमानतळाचे नियंत्रण अमेरिकन सुरक्षा दलांच्या हातात आहे.

कोण आहे हा चिमुरडा? ज्याला विना पासपोर्ट मिळाली भारतात एन्ट्री

काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितले की, त्यांनी विमानतळाच्या दाराबाहेर मोठी गर्दी जमू नये यासाठी सूचना जारी केल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळावर परिस्थिती बिकट आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान्यांनी आता राजधानी काबुलला चारही बाजूंनी घेरले आहे. यामुळेच देशात हल्ल्यांचा धोका आणखी वाढला आहे.

भारतातून दररोज दोन उड्डाणास परवानगी

तालिबाननं (Taliban)अफगाणिस्ताना (Afghanistan)वर कब्जा मिळवल्यानंतर प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात भारत देशाकडूनही प्रयत्न सुरु आहेत. भारत सातत्यानं हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने (Indian Government) आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसी (Evacuate) साठी दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली आहे.

जीव गेला पण नागाला रोखलंच; चिमुकल्यांना वाचवण्यासाठी कुत्र्याची कोब्राशी झुंज, पुण्यातील घटना  

अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Afghanistan, America, Kabul