आठवड्यात 'रविवार' येतील बरं का तीनदा..या प्रसिद्ध कंपनीची 3 Week off देण्याची घोषणा!
आठवड्यात 'रविवार' येतील बरं का तीनदा..या प्रसिद्ध कंपनीची 3 Week off देण्याची घोषणा!
ऑफिसमध्ये प्रमोशन
या प्रसिद्ध कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन सुट्या देणार असल्याचं जाहीर केलं आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ 4 दिवस कामावर यावं लागणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
नवी दिल्ली, 4 मे : याप्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन सुट्या देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ 4 दिवस कामावर यावं लागणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
या कंपनीचे नाव पॅनासोनिक (Panasonic) असून ती जपानी कंपनी आहे. पॅनासोनिकने जपानी सरकारच्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांनंतर हे पाऊल उचलले आहे. सरकारने कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांना चार दिवसांचे काम आणि तीन दिवस सुट्टीसाठी प्रोत्साहित करण्यास सांगितलं आहे.
सरकारचं म्हणणं आहे की, अतिरिक्त सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांची मुले, पालक, कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याची काळजी घेण्यासाठी किंवा स्वयंसेवी काम करण्यास मदत मिळेल.
हे वाचा - 21 व्या शतकातही या देशात महिलांना Driving License न देण्याचे आदेशआठवड्यातून 3 सुट्ट्या
'जपान टाईम्स'च्या वृत्तानुसार, पॅनासोनिक कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, एका आठवड्यात 3 सुट्ट्या घेण्याचा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. याचा परिणाम पाहिल्यानंतर, तो पूर्णवेळ करण्याचा विचार केला जाईल. तथापि, जपानमधील हिटाची (Hitachi), मिझुहो फायनान्शियल ग्रुप (Mizuho Financial Group), फास्ट रिटेलिंग (Fast Retailing), युनिकलो (Uniqlo) सारख्या कंपन्या पॅनासोनिकच्या आधीपासून त्यांच्या कर्मचार्यांना एका आठवड्यात तीन सुट्ट्या देत आहेत.
हे वाचा - 2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिक युद्धकैदी? सर्वांना रशियाला नेल्याचा दावा
याबाबत रिक्रूट वर्क्स इन्स्टिट्यूटचे (Recruit Works Institute) वरिष्ठ संशोधक हिरोमी मुराता यांनी सांगितलं की, कंपन्यांना शॉर्ट वर्क वीक योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना जोडून ठेवायचं आहे. कारण नवीन कर्मचार्यांची नियुक्ती आणि प्रशिक्षणासाठी वेळ लागतो.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.